गोव्यातील 23 न्यायाधीशांच्या बदल्या

गोव्यातील 23 न्यायाधीशांच्या बदल्या
Goa court

पणजी: प्रधान सत्र व जिल्हा न्यायाधीश ते प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसह 23 न्यायाधीशांच्या  बदल्यांचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रजिस्ट्रार एस. सी. डिंगे यांनी जारी केले. पणजीचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांची मडगाव येथे, तर त्या पदावर असलेले प्रधान न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांची पणजीत बदली झाली आहे. पणजीचे अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश शेरीन पॉल यांची म्हापसा येथे व त्यांच्या जागी एडगर फर्नांडिस, म्हापशातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांची बदली फोंडा येथे व त्याजागी असलेल्या न्यायाधीश बेला नाईक यांची पणजी येथे बदली करण्यात आली आहे. औद्योगिक व कामगार लवादाचे अध्यक्ष व न्यायाधीश विन्सेंट डिसिल्वा यांची बदली मडगाव जिल्हा व सत्र न्यायालयात, तर म्हापसा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश दुर्गा मडकईकर यांची मडगाव येथे बदली करण्यात आली आहे. (Mumbai High Court orders transfer of 23 Goa judges)

मडगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी राम प्रभूदेसाई याची पणजी येथे तर त्यांच्या जागी न्यायाधीश अपूर्वा नागवेकर, मडगाव येथील प्रथमश्रेणी न्यायाधीश साई प्रभुदेसाई यांची फोंडा येथे, तर त्या जागी असलेले न्यायदंडाधिकारी अनिल स्कारिया यांची बदली पणजीत झाली आहे. न्यायादंडाधिकारी आर. फर्नांडिस यांना त्यांच्या मूळ जागी मडगाव येथे पाठवण्यात आले आहे तर न्यायदंडाधिकारी शुभदा दळवी यांना त्यांच्या मूळ वास्को येथे पाठवण्यात आले आहे. पणजीच्या मुख्य न्यायदंडाधिकारी आरतीकुमारी नाईक यांना पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाचा ताबा देण्यात आला आहे. 

म्हापसा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी श्री शेणाई कुडचडकर यांची मडगाव येथे, त्यांच्या जागी न्यादंडाधिकारी निलिमा काणकोणकर, न्यायदंडाधिकारी अक्षता काळे यांची डिचोली येथे, तर न्यायदंडाधिकारी गिरीजा गावकर यांची बदली केपे येथे झाली आहे. न्यायदंडाधिकारी ज्यूड सिक्वेरा यांची वाळपई येथे, तर न्यायदंडाधिकारी मनिषा शैलेश नार्वेकर यांची मडगाव येथे बदली करण्यात आली आहे. न्यायदंडाधिकारी सबिना ब्रागांझा यांची पणजी येथे, तर न्यायदंडाधिकारी सुमन गाड यांची पेडणे येथे बदली करण्यात आली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com