Goa: वर्षभरात 11 वेळा NCB ची छापेमारी, तरीही कार्डेलिया क्रुझवर रंगली ड्रग्ज पार्टी

कार्डेलिया क्रुझ काल रात्री मुंबई येथून गोव्याला येत होती. याच क्रुझने याआधीही गोव्याला पहिली भेट दिली होती.
Mumbai NCB Raid: Cordelia Cruise has already made first round to Goa
Mumbai NCB Raid: Cordelia Cruise has already made first round to GoaDainik Gomantak

अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) ‘फॅशन शो’च्या नावाखाली कार्डेलिया क्रुझवर (Cordelia Cruises) ड्रग्ज पार्टीचा (Drugs Party) काल पर्दाफाश केला. या क्रुझवर जवळपास 15000 लोक होते. यात बॉलिवुडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांचाही समावेश होता. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये बॉलिवुडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाचाही या ड्रग्ज पार्टी प्रकरणात समावेश आहे. हे क्रुझ काल रात्री मुंबई येथून गोव्याला येत होते. याच क्रुझने याआधीही गोव्याला पहिली भेट दिली होती.

कोर्डेलिया क्रुझ मुरगाव बंदरात

गोव्यात समुद्र पर्यटनाच्या मोसमाला आरंभ झाला असून रविवारी कोर्डेलिया क्रुझ हे प्रवाशी जहाज 1500 प्रवासी व 600 क्रुझसह मुरगाव बंदरात आले होते.1 ऑक्टोबर 2021 ते 7 एप्रिल 2023 या हंगामामध्ये सदर जहाज एकूण 58 फेऱ्या गोव्यात मारणार आहेत. आणि याच क्रुझवर ही ड्रग्ज पार्टी रंगात आली असतांना NCB ने ही कारवाई केली आहे.

जर अंमली पदार्थविरोधी पथकाने (Narcotics Control Bureau) या क्रूझवर कारवाई केली नसती तर मोठ्या प्रमाणात हे अंमली पदार्थ आज गोव्यात आणण्यात आले असते. गोवा अंमली पदार्थ मुक्त राज्य बनविण्यासाठी राज्य प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. आणि गोवा अंमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या दोन महिन्यापासून गोव्यात मोठमोठ्या कारवाई केल्या आहेत.

Mumbai NCB Raid: Cordelia Cruise has already made first round to Goa
मुंबई विमानतळावरून अमली पदार्थ जप्त; NCB ची मोठी कारवाई

आठ महिन्यांत गोव्यात 11 कारवायां

मात्र कोरोनाचे निर्बंध सुरू असतानाही राज्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) गेल्या आठ महिन्यांत गोव्यात 11 कारवायांमध्ये 24 जणांना अटक केली आहे. यात 10 विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत साडेतीन कोटींहून अधिक असल्याची माहिती विभागाचे अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे यांनी दिली होती.

आणि कार्डेलिया क्रुझ मुंबईकडे वळविली

दरम्यान काल झालेल्या कारवाईहून असे लक्षात येतेय की, NCB पथकाने ही कारवाई काल केली नसती तर हे क्रुझ मुंबईवरुन गोव्याला आरामात पोहचले असते. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या टीमकडून ही मोठी करावाई केल्याने सध्या हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या क्रुझवर आठ तासांहून अधिक वेळ कारवाई सुरु होती. गोव्याला जात असतांनाच ही करावाई झाल्याने गोव्यात येणारे ड्रग्स मुंबईतच जप्त करण्यात आले. क्रुझ मुंबईवरुन निघताच धुमडाक्यात ही ड्रग्ज पार्टी सुरु झाली. एनसीबीची टीम क्रुझवर पोहचताच मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळाल्यानंतर ही क्रुझ मुंबईकडे वळवण्यात आली.

Mumbai NCB Raid: Cordelia Cruise has already made first round to Goa
Mumbai: अंमली पदार्थ प्रकरणी शाहरुख खानच्या मुलाची चौकशी सुरु

इतके ग्रॅम ड्रग्ज गोव्यात पोहचले असते

मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या पथकातर्फे मुंबईतील समुद्रात क्रुझवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटींची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अमली पदार्थांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकला. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्ज, एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. या कारवाईमध्ये अनेकांना ताब्यात घेतले आहे. त्यात अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकीन 25 ग्रॅम MDMA च्या टॅबलेट्स 10 ग्रॅम MD ड्रग्ज गोव्यात पोहचले असते.

अर्जुन रामपालचीही NCB चौकशी

मागील आठवड्यातच NCB मुंबई आणि गोवा यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रीएड्सच्या भावाला गोव्यातील एका ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. त्याच्याकडून चरस जप्त करण्यात आले आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ने मुंबईसह गोव्यात अनेक ठिकाणी छापेमारी सुरू ठेवली आहे. उत्तर गोव्यातील शिवोली परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. अशी माहिती एनसीबी च्या अधिकाऱ्यांनी दिली होती.

या प्रकरणात अर्जुन रामपालचीही अंमली पदार्थ विरोधी विभागानं चौकशी केली होती. आणि आता पुन्हा एका मोठ्या बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाचा काल झालेल्या कारवाईत समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. तेव्हा बॉलिवूड, गोवा, आणि ड्रग्स असं तिहेरी कनेक्शन कधी उलगडणार हे तर NCBचं जाणे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com