Goa Assembly Session: पालिका कायदा दुरुस्ती विधेयक गदारोळात मंजूर

नगरपालिका कायदा दुरुस्ती विधेयकावरून विरोधकांची टीका; यापुढे हात उंचावून होणार मतदान
Goa Assembly
Goa Assembly Dainik Gomantak

Goa Assembly Session: नगरपालिका कायदा दुरुस्ती विधेयकावरून काल विधानसभेत गदारोळ झाला. या विधेयकाद्वारे सरकार स्थानिक स्वराज संस्थांचा गळा आवळून लोकशाहीची हत्या करत असल्याची टीका विरोधकांनी केली.

हे विधेयक मंजूर करण्याऐवजी ते चिकित्सा समितीकडे पाठवावे, अशीही मागणी करण्यात आली. तरीही विरोधकांच्या टीकेची पर्वा न करता आवाजी मतदानाद्वारे हे विधेयक संमत करण्यात आले.

नगरविकास मंत्री विश्‍वजीत राणे यांनी हे विधेयक मंगळवारी विधानसभेत मांडले होते. बुधवारी दुपारी हे विधेयक चर्चेसाठी सभागृहात आल्यानंतर विरोधी आमदारांनी सरकारवर हल्लाबोल केला.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी आक्रमक होत राणे यांना धारेवर धरले. काल हे विधेयक संमत केले तर राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये ही साथ कॅन्सरसारखी पसरण्याचा धोका आहे.

उद्या याचा गैरफायदा घेऊन पंचायत कायद्यात देखील अशाच प्रकारची दुरुस्ती केली तर स्थानिक संस्थांमध्ये असलेली लोकशाही संपून जाईल, अशी भीती सरदेसाई यांनी व्यक्त केली.

Goa Assembly
Goa Government: ‘साबांखा’तील भरती घोटाळ्याचा सूत्रधार कोण ?70 कोटींचा घपला

काय आहे पालिका कायदा दुरुस्ती विधेयक?

नगरपालिका कायदा दुरुस्ती विधेयक हा सरकार आणि विरोधकांमध्ये वादाचा विषय ठरला आहे. हे विधेयक अस्तित्वात आले तर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी एरवी गुप्तपणे मतपत्रिकेद्वारे होणारे मतदान यापुढे हात उंचावून केले जाईल.

त्यामुळे कोणत्या नगरसेवकांनी मतदान केले, हे गुपित राहणार नाही.

नगरपालिका कायदा दुरुस्ती विधेयक आणून राज्य सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. हा रोग नगरपालिकांमध्ये सुरू होऊन ग्रामपंचायतींमध्येही शिरणार आहे.

हे धोकादायक आहे. हे विधेयक संमत करून हे सरकार लोकशाहीची हत्या करणारे सरकार म्हणून ओळखले जाईल. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

Goa Assembly
Goa News: कालचा वार अपघातवार ! राज्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघात

हा खटाटोप मडगाव पालिकेसाठी

विजय सरदेसाई म्हणाले की, हा सगळा खटाटोप सरकार मडगाव नगरपालिकेसाठी करत आहे. एका नगरपालिकेसाठी राज्यातील सगळ्या नगरपालिकांमधील लोकशाही संपणार आहे.

खुद्द मुख्यमंत्र्यांनीदेखील साखळी नगरपालिका काबीज करण्यासाठी अशा प्रकारे कायद्यात दुरुस्ती केली नाही. परंतु आज एका माणसाच्या महत्त्वाकांक्षेसाठी सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com