Municipal corporation election 2021: पणजी महापालिकेच्या मतदानास संथपणे सुरुवात

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

पणजी महापालिकेच्या 30 प्रभागासाठी  मतदानास संथपणे  सुरुवात. पेडणे पालिकेत पहिल्या दोन तासात 28.09 टक्के मतदान झाले आहे. मडगाव जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सकाळी 11  पर्यंत सुमारे 13 टक्के मतदान झाले.

पणजी: पेडणे पालिकेत पहिल्या दोन तासात 28.09 टक्के मतदान झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजता मतदान सुरू झाल्यानंतर 10 वाजेपर्यंत पेडणे पालिकेसाठी 28. 09 टक्के, डिचोली पालिकेसाठी 18.17 टक्के, वाळपई पालिकेसाठी 20.16 टक्के, कुकळ्ळी पालिकेसाठी 16.22 टक्के, कुडचडे - काकोडा पालिकेसाठी 15.74 टक्के व काणकोण पालिकेसाठी 21.02 टक्के मतदान झाले.

पणजी महापालिकेच्या 30 प्रभागासाठी  मतदानास संथपणे  सुरुवात. सकाळी 8 ते 10 या दोनतासात फक्त 16.33 टक्के मतदान.   महापौर उदय मडकईकर यांनी  भाटले येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

पणजी महापालिकेच्या 30 प्रभागासाठी मतदान सुरु

मडगाव जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सकाळी 11  पर्यंत सुमारे 13 टक्के मतदान झाले. सकाळी 8 ते 10 पर्यंत मतदान धीम्या गतीने सुरु होते. 10 नंतर काही मतदान केंद्रावर मतदारांची रांग दिसू लागली. 
या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे सत्यविजय नाईक, काॅंग्रेसच्या अॅड. प्रतिमा कुतिन्हो, आम आदमी पार्टीच्या (आप) माटिल्डा डिसिल्वा असे चार उमेदवार रिंगणात आहेत. 

चिंचोळे भाटले येथील सरकारी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांच्या रागा लागल्या होत्या. या प्रभागातून महापौर उदय मडकईकर  निवडणूक लढवत आहेत.

संबंधित बातम्या