महानगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे पत्र दाखल: मार्केटवर आता महापालिकेचा पूर्ण कब्जा!

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

मार्केटवर महापालिकेचा पूर्ण कब्जा मिळविण्यात अडचण ठरलेल्या आरोग्य खात्याकडून जागा सुपूर्द केल्याचे पत्र आज महानगरपालिका प्रशासन संचालनालय (डीएमए) सादर झाले आहे

पणजी: मार्केटवर महापालिकेचा पूर्ण कब्जा मिळविण्यात अडचण ठरलेल्या आरोग्य खात्याकडून जागा सुपूर्द केल्याचे पत्र आज महानगरपालिका प्रशासन संचालनालय (डीएमए) सादर झाले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून भाडेकराराचा थिजत पडलेला प्रश्‍न आता सुटणार असून, येत्या दोन दिवसांत महापालिकेच्या भाडेकरारांना सुरुवात होणार आहे. आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर, आयुक्त संजित रॉड्रिग्स आणि बाजार समितीचे अध्यक्ष शेखर डेगेवकर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे यश आले आहे. दरम्यान, या आठवड्यात मार्केटमधील दुकानांचे भाडेकरार होणार हे दैनिक ‘गोमन्तक''ने दिलेल्या वृत्तावर आता विश्‍वासाची मोहोर उमटली आहे.

या भाडेकरारामुळे १ हजार ४२४ दुकांनाचा मुद्दा निकाली निघणार आहे. परंतु त्यातील ३० जणांचे दावे न्यायालयात आहेत, त्यामुळे सुमारे १ हजार ३९४ दुकान मालकांशी महापालिकेला भाडेकरार करता येणार आहेत.  महापालिकेने भाडेकराराचा मसुदाही तयार केला असल्याने पालिका प्रशासनाकडून महापालिकेला कब्जाचे पत्र उद्यापर्यंत (बुधवार) मिळाल्यास गुरुवारपासून करारास सुरुवात होऊ शकते. या कामासाठी गेली दीड वर्षांपासून आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर आणि अलीकडे आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनीही प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू ठेवले होते. बाजार समितीचे अध्यक्ष शेखर डेगवेकर यांनीही आमदार व महापौरांच्या मार्गदर्शनाखाली त्यास गती दिली. अखेर या सर्वांच्या प्रयत्नामुळे हे काम गतीने पुढे गेले आहे. 

अनेक वर्षांपासून रखडलेल्या या भाडेकरारामुळे अनेकांना दुकानांची काही वर्षांसाठी मालकी मिळणार आहे. त्याचबरोबर महापालिकेला थकीत वीज बिलही भरण्यासाठी काही रक्कम  भाडेकरारातून उभी करता येणार आहे. कोट्यवधी रुपयांचे थकीत वीज बिल असल्याने ते एक महापालिकेसाठी मोठे अवघड जागेवरील दुखणे बनले होते. याशिवाय महापालिकेला सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरा, तसेच स्वच्छतेचे स्वतंत्र कंत्राट देण्यात काहीच अडचण राहणार नाही. मार्केटच्या दुसऱ्या टप्प्याचेही कामसुद्धा आता मार्गी लावता येणे शक्य होणार आहे. ता. १६ रोजी दैनिक गोमन्तकने या आठवड्यातच महापालिकेचा मार्केटमधील दुकानांशी भाडेकरार होईल, हे वृत्त आता खरे ठरले आहे. 

३० वर्षाचा भाडे करार
डीएमएकडून आम्हाला मालकी हक्क हवा असल्याने आम्ही आरोग्य खात्याला तसे कळविले होते. त्यानुसार आता मार्केटची मालकी आम्हाला मिळेल. महसूल खात्यात अनेक काळ या कराराविषयीची फाईल पडून होती, मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी ती फाईल पुढे नेल्याने त्या कामाला खऱ्या अर्थाने गती आली. आम्ही दुकानदारांबरोबर ३० वर्षांचा भाडे करार करणार आहोत. या करारामुळे महापालिकेच्या महत्त्वाचा विजेच्या थकीत बिलाचा प्रश्‍न सोडविण्यास मदत होईल. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी महापालिकेच्या ताब्यात मार्केट देण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय आता सत्यात उतरला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री जेनिफर मोन्सेरात, आमदार बाबूश मोन्सेरात, आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनीही या कामासाठी सहकार्य केल्याने आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. या आठवड्यात कराराच्या कामाला शुभारंभ होईल, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.

   आरोग्य खात्याची मिळाली संमती!
  महापालिकेचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्‍न सुटणार
  एक हजारांवर अधिक दुकानांशी भाडेकरार होणार
  लाखो रुपयांचा महसूल येणार महापालिकेच्या तिजोरीत
  आमदार, महापौर, आयुक्त व बाजार समितीच्या प्रयत्नांना य

संबंधित बातम्या