साखळीत मोकाट गुरांविरोधात पालिकेची पुन्हा मोहीम

प्रतिनिधी
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

 रस्ते वा सार्वजनिक ठिकाणी उपद्रव ठरणाऱ्या मोकाट गुरांविरोधात साखळी पालिकेने पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली आहे.

डिचोली:  रस्ते वा सार्वजनिक ठिकाणी उपद्रव ठरणाऱ्या मोकाट गुरांविरोधात साखळी पालिकेने पुन्हा एकदा मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेंतर्गत काल सोमवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील रस्त्यावर भटकणाऱ्या काही गुरांना पकडून त्यांची रवानगी  गोमंतक गौसेवक महासंघाच्या सिकेरी-पैरा येथील गोशाळेत करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

मुख्याधिकारी प्रवीणजय पंडित यांच्या निर्देशानुसार अधिकारी नारायण परब यांच्या निरीक्षणाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. साखळी शहरात दिवसेंदिवस मोकाट गुरांची समस्या गंभीर बनत आहे. बाजारहाटीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाही या मोकाट गुरांपासून उपद्रव सहन करावा लागत आहे. मागील वर्षी पालिकेने सिकेरी-पैरा येथील गोशाळेशी करार केल्यानंतर शहरातील काही मोकाट गुरांना पकडून त्यांची रवानगी गोशाळेत केली होती. त्यानंतर ही मोहीम बंद होती. आता पुन्हा एकदा मोकाट गुरांविरोधात पालिकेने मोहीम उघडली आहे.

संबंधित बातम्या

Tags