एसजीपीडीए बाजारातील कचरा न उचलण्याचा पालिकेचा निर्णय

एसजीपीडीए बाजारातील कचरा उचलप्रकरणी पालिकेला 2014-15 पासून आतापर्यंत सुमारे 1 कोटींहून अधिक येणे असल्याने ही रक्कम चुकती होईपर्यंत तेथील कचरा न उचलण्याचा निर्णय मडगाव पालिकेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
एसजीपीडीए बाजारातील कचरा न उचलण्याचा पालिकेचा निर्णय
Margao Municipal Council Dainik Gomantak

मडगाव : एसजीपीडीए बाजारातील कचरा उचलप्रकरणी पालिकेला 2014-15 पासून आतापर्यंत सुमारे 1 कोटींहून अधिक येणे असल्याने ही रक्कम चुकती होईपर्यंत तेथील कचरा न उचलण्याचा निर्णय मडगाव पालिकेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Margao Municipal Council
गाडीच्या धडकेत कुडचडे येथे विद्यार्थिनी जखमी

पालिकेने अनेक स्मरणपत्रे पाठवूनही त्याची दखल न घेतल्याबद्दल नगरसेवकांनी नापसंती व्यक्त केली. या प्रकरणात इतरांना जो नियम लावतात तोच सरकारी यंत्रणेला लावण्याचे एकमताने ठरवण्यात आले.

या बैठकीत रोजंदारीवरील व कंत्राटी कामगारांना रोज 700 रुपये चुकते करण्याचा पण त्यांच्या कामाच्या वेळांबाबत सतर्क राहण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या मालट्रकांना जीपीएस यंत्रणा बसवण्याच्या मुद्द्यावर बैठकीत खडाजंगी झाली. शेवटी एकाच वाहनाला प्रात्यक्षिक तत्त्वावर ती प्रथम बसवून पाहण्याचे ठरले.

मुख्याधिकारी रोहित कदम यांनी सोनसोडोवरील सुका कचरा वर्गीकरण व त्याची विल्हेवाट यासाठी कौटिल्य री पोलिमर्स प्रा. लि. यांच्याकडून आलेल्या प्रस्तावाची माहिती दिली असता पालिकेला त्यासाठी कोणतीच गुंतवणूक करावी लागणार नसल्याने ती तत्वतः मान्य करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेचा सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी सादर केलेला प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com