Goa Electricity: भूमिगत वीज वाहिन्यांनी पालिका, कृषी क्षेत्र, किनारीपट्टी जोडणार- सुदिन ढवळीकर

मुख्य वीज केंद्रे व काही उपकेंद्रांच्या भारनियमन क्षमतेत वाढ व सुधारणा घडविण्यात येणार असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
Goa Electricity
Goa ElectricityDainik Gomantak

नवीन वर्षारंभापासून गोव्यातील सर्व नगरपालिका क्षेत्र, किनारी भाग तसेच वन व कृषी क्षेत्र भूमिगत वीज वाहिन्यांखाली आणण्याची योजना असून ती लवकरच मार्गी लागणार आहे. तसेच मुख्य वीज केंद्रे व काही उपकेंद्रांच्या भारनियमन क्षमतेत वाढ व सुधारणा घडविण्यात येणार असल्याची माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी नववर्षारंभी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Goa Electricity
GPSC Exam Update: GPSC चा मोठा निर्णय! सर्व पदांसाठी एकच सामायिक परीक्षा

अनेक वीजकेंद्रांमध्ये सुधारणा-

वेर्णा, साकवाळ व साळगांव वीज केंद्रामध्येही काही महत्त्वाच्या सुधारणा होणार आहेत. राज्यातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही ठिकाणी नवीन उपकेंद्रे उभारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्व नगरपालिका, किनारी भाग, वनक्षेत्र व कृषी भूक्षेत्र भूमिगत वीज वाहिन्यांखाली आणण्याची महत्त्वाची योजना असल्याची माहिती मंत्री ढवळीकर यांनी दिली.

नववर्षारंभी प्रसारमाध्यमांशी बोलताना वीज खात्याच्या आगामी योजना व फोंडा तालुक्याशी संबंधित काही नवी नियोजित विकासाच्या प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.

Goa Electricity
GST Collection In Goa: राज्याच्या जीएसटी संकलनात 22 टक्क्यांनी घट

मडकईतही वीजसेवेचा विस्तार होणार-

मडकई मतदारसंघात बांदोडा किंवा कवळे पंचायतक्षेत्रात नवीन बीज उपकेंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच कुर्टी व अन्य काही वीज केंद्रांची, भारनियमन क्षमता वाढवून वीज सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. सौर उर्जा योजनेखाली राज्यात १५० मेगा वॅट वीज निर्मितीसाठी सौर उर्जा धोरण आखले जाणार आहे. फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यात येतील. अंतिम टप्प्यात आलेला फोंड्यातील मलनिस्सारण प्रकल्पही पूर्ण करुन कार्यान्वित केला जाईल व त्यानंतर सर्व रस्ते हॉटमिक्स करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com