काणकोण येथील खूनप्रकरणी नेपाळी नागरिक दोषी

पोलिसांनी आरोपीला दोन वर्षांपूर्वी काणकोण रेल्वे स्थानकावर अटक केली होती.
murder accused arrested from Nepal in goa
murder accused arrested from Nepal in goaDainik Gomantak

मडगाव : पैशासाठी आपल्या सहकारी कामगाराचा खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात काणकोण पोलिसांनी रेल्वे स्थानकावर एका नेपाळी नागरिकाला अटक केली होती. निमा तमंग या नेपाळी आरोपीला दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरविले असून आज 30 जुलै रोजी त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

दोन वर्षांपूर्वी पाळोळे येथे हा खून झाला होता. एका शॅकवर वेटर म्हणून काम करणाऱ्या रणजित हिरासिंग (वय 27) याच्या डोक्यावर लाकडाच्या दांड्याने वार करून आरोपी त्याच्याकडे असलेले पैसे घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला काणकोण रेल्वे स्थानकावर अटक केली होती.

murder accused arrested from Nepal in goa
गोव्यातील 39 गावे अद्यापही 4-जी नेटवर्क सेवेपासून वंचित!

या हल्ल्यात जखमी झालेल्या वेटरला उपचारासाठी इस्पितळात नेले असता तिथे त्याला मृत जाहीर करण्यात आले होते. या प्रकरणी काणकोणचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी तपास केला होता. आज शनिवारी 30 जुलै रोजी न्या. डिसिल्वा आरोपीचे म्हणणे ऐकून घेऊन नंतर त्याला शिक्षा ठोठावणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com