अडीच महिन्यात 8 खुनांची नोंद; गोव्यात का वाढतेय गुन्हेगारी?

राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेवर वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रश्‍नचिन्‍ह
अडीच महिन्यात 8 खुनांची नोंद; गोव्यात का वाढतेय गुन्हेगारी?
murder case in goaDainik Gomantak

पणजी : गोव्यात गेल्‍या अडीच महिन्‍यांपासून खुनाच्‍या घटना वाढल्‍याचं चित्र आहे. राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेवर वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे. एप्रिलपासून आतापर्यंत राज्‍यातील विविध पोलिस स्‍थानकांत तब्बल 8 खुनांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

murder case in goa
वादग्रस्त सिल्व्हर सँड हॉटेलवरील कारवाई नेमकी का रखडली?

खुनाच्या घटनांपैकी महत्त्वाची असलेल्या मालिम जेटी - बेती येथे टॉलर्सवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये 6 मार्चच्या दरम्यान किरकोळ भांडणाचे पर्यवसान खुनात झाले. या कामगारांपैकी एकाचा वाढदिवस होता. यानिमित्त त्‍यांनी पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्‍या किरकोळ बाचाबाचीतून 20 वर्षीय शिब्रण राम या कामगाराला त्‍याच्‍या चार साथीदारांनी बेदम मारहाण केली आणि त्‍याला मांडवी नदीत फेकून दिले. दुसऱ्या दिवशी त्‍याचा मृतदेह नदी पात्रात आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या

murder case in goa
गोव्यात सरकारी नोकरीची संधी; पोस्टात 39 पदांसाठी अर्ज मागवले

दुसरीकडे जुने गोवे येथे मोबाईल टॉवरचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये हाणामारी झाली होती. ज्यात एका कामगाराला आपला जीव गमावावा लागला होता. 13 मार्च दरम्‍यान तोमणे-लोलये, काणकोण येथे एका विवाहित मुलीचा आणि तिच्‍या आईचा संशयास्‍पद परिस्‍थितीत मृतदेह आढळला होता. मुलीचा मृतदेह येथील तळ्यात तर आईचा एका झाडाला लटकलेला आढळला होता.

यानंतर 20 मार्चच्या दरम्‍यान बंदरवाडा - डिचोली येथे किरकोळ भांडणातून मित्राच्‍या डोक्‍यात दगड घालून खून झाल्‍याची घटना घडली. 27 मार्च दरम्‍यान धडे-सावर्डे येथे दत्तकपुत्राकडून आईचा खून होण्याची दुर्दैवी घटना घडली. प्रेमप्रकरणास विरोध केल्‍याच्‍या रागातून दत्तक पुत्राने आईचा खून केला होता.

17 एप्रिल रोजी सोळोबांद - आंबेली, असोळणा येथे मानसिक संतुलन बिघडलेल्‍या मुलीने स्‍वतःच्‍या वडिलांचा खून केला. तर 28 एप्रिल रोजी काणकोण - गुळे येथील चारित्र्याच्‍या संशयावरून पतीने पत्‍नीचा खून केल्‍याची घटना घडली होती. एकंदरितच वाढलेली गुन्हेगारी पोलिसांसमोर नवं आव्हान म्हणून उभी ठाकली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.