कुंडईत सख्या भावानेच केला धाकट्या भावाचा खून

दैनिक गोमंतक
बुधवार, 9 जून 2021

वाडीवाडा-कुंडई येथे सख्या भावानेच आपल्या धाकट्या भावाचा खून(MURDER) करण्याचा प्रकार रात्री उशिरा घडला. फोंडा (PONDA POLICE) पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

फोंडा : वाडीवाडा-कुंडई(wadiwada kundaim goa) येथे सख्या भावानेच आपल्या धाकट्या भावाचा खून(MURDER) करण्याचा प्रकार रात्री उशिरा घडला. फोंडा (PONDA POLICE) पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. खुनाचा(Crime) हा प्रकार काल मंगळवारी उघडकीस आला. पैशांच्या वादावरून हा खून झाला असावा असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत माहिती अशी की, वाडीवाडा-कुंडई येथे एकाच घरात राहणाऱ्या प्रभाकर गुरुदास नाईक (वय 41) व त्याचा मोठा भाऊ सागर गुरुदास नाईक (वय 50) यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यात सागरने प्रभाकरचा खून केला. खुनासाठी सागरने लोखंडी सळीचा वापर केल्याचा पोलिसांचा कयास असून, मयत प्रभाकरच्या डोक्यावर व अन्य शरिरावर जखमा आहेत. मात्र खुनासाठी वापरण्यात आलेली हत्यार सापडू शकली नाहीत. (The murder of younger brother was his little brother at wadiwada kundaim)

गोव्यातील भरवशाचे पर्यटनक्षेत्र कोलमडले..!

प्रभाकर व सागर या दोन्ही भावात संध्याकाळी सहाच्या सुमारास भांडणाला सुरवात झाली असावी, अशी माहिती देण्यात आली. दोघांचीही घरात झटापट झाली. त्यात सागरने प्रभाकरवर जोरदार हल्ला चढवला. घराच्या खोलीत रक्त सांडले होते. संध्याकाळी सातच्या सुमारास कामाला गेलेली सागरची पत्नी घरी आली असता तिला प्रभाकर निपचिप पडलेला दिसला. जवळच सागरही जखमी अवस्थेत बसला होता. सागरच्या पत्नीने लगेच रुग्णवाहिकेला फोन लावला. पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली.या प्रकारची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयिक सागर नाईक याला ताब्यात घेतले. तो काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता. फोंडा पोलिस ठाण्यात निरीक्षक मोहन गावडे यांनी पंचनामा केला. यावेळी पोलिस उपअधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञ तसेच तपासणीसाठी इतर तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. उशिरा मयत प्रभाकरचा मृत्यदेह बांबोळी(Bambolim) हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 

मुलांना बाहेर पिटाळले
घरात दोन्ही भावांचे भांडण सुरू झाल्यावर मयत प्रभाकरने घरात असलेल्या संशयित सागरच्या मुलांना धोका नको म्हणून घराबाहेर पिटाळले होते. सागरला तीन मुळे असून ती घाबरूनच नजीकच असलेल्या देवळांत जाऊन बसली होती. आई कामावरून परतल्यानंतर ती घरात शिरली होती. त्यावेळी त्यांना काका प्रभाकर निपचीत पडलेला दिसला. मयत प्रभाकर अविवाहीत असून सागरने यापूर्वी खून केलेल्या रत्नाकरने लग्न केली होते. पण, त्यांना मूल नव्हते, अशी माहिती देण्यात आली. रत्नाकरचा खून केल्यानंतर त्याची बायको माहेरी रहायला आली होती.

गोव्यातील ‘त्या’ घरात 60 वर्षानंतर विजेचा प्रकाश!

यापूर्वी मोठ्या भावाचाही केला होता खून
या खून प्रकरणातील संशयित सागर नाईक याने 2012 साली आपला मोठा भाऊ रत्नाकर नाईक याचाही खून केला होता. त्यावेळी त्याला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. सागरला त्यानंतर 2016 साली मुक्त करण्यात आले होते. मानसिक स्थिती ठीक नसल्याच्या कारणाचा त्याने लाभ उठवला होता. गेली चार वर्षे तो घरीच होता आणि मिळेल ते काम करीत होता. मयत प्रभाकरही मिळेल ते काम करून पोट भरत होता. यापूर्वी त्याने कुंडई पंचायतीचा निवडणूकही लढवली होती.

संबंधित बातम्या