Goa News: ...यामुळे मुर्डी बंधाऱ्याचे काम पुन्हा रोखले

सोनारबाग-मुर्डी, खांडेपार येथील नियोजित बंधाऱ्याचे काम सोनारबाग-उसगाववासीयांनी मंगळवारी बंद पाडले.
Goa News| Cannal Work
Goa News| Cannal WorkDainik Gomantak

Goa News: सोनारबाग-मुर्डी, खांडेपार येथील नियोजित बंधाऱ्याचे काम सोनारबाग-उसगाववासीयांनी मंगळवारी बंद पाडले. यावेळी ग्रामस्थांसह स्थानिक उसगाव पंचायतीच्या प्रभाग क्रमांक पाचचे पंचसदस्य विनोद मास्कारेन्हस उपस्थित होते.

खांडेपार नदीवरील बंधाऱ्याच्या कामासाठी प्राथमिक स्तरावर पाहणी करून आवश्‍यक काम सुरू करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने मशिनरी पाण्यात घातली असता, येथील लोकांनी त्याला आक्षेप घेत हे काम अडविले. यावेळी तणाव निर्माण झाल्याने फोंड्याचे मामलेदार तसेच पोलिसांनी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

सोनारबाग-मुर्डी येथील बंधाऱ्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. यासंबंधीचे प्राथमिक काम सुरू आहे, मात्र येथील घरांना पुराच्या पाण्याचा धोका संभवत असल्याने ग्रामस्थांनी या बंधाऱ्याला विरोध केला आहे.

गेल्या वर्षी आलेल्या महापुरामुळे येथील घरांना पाण्याचा धोका निर्माण झाला होता. काही घरांना पुराच्या पाण्याचा फटकाही बसला होता, मात्र सरकारकडून यासंबंधी कोणतीच नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे पंचसदस्य मास्कारेन्हस यांनी सांगितले.

सदर बंधारा बांधला तर पुराचा धोका कायम राहणार असून आम्हाला बंधाराच नको, असा धोषा स्थानिकांनी लावला व मशिनरी तेथून हटवायला सांगितली. शेवटी सरकारी यंत्रणेने बंधाऱ्याचे काम बंद पाडण्याची सूचना केली. त्यामुळे बंधारा बांधण्याचे काम तूर्त स्थगित करण्यात आले आहे.

Goa News| Cannal Work
Water Issue: विळियणवासीयांची सांगेच्या पाणीपुरवठा कार्यालयावर धडक

ग्रामसभेत होणार निर्णय

या बंधाऱ्याचा विषय उसगाव-गांजे पंचायतीकडे आला होता. त्यावेळी ग्रामसभेत बंधाऱ्याविरोधी ठराव घेण्‍याचे ग्रामस्थांनी ठरविले होते. पण अजून ग्रामसभाच झाली नसल्याने पंचायतीत निर्णय झालेला नाही. तरीसुद्धा या संबंधीच्या तीन बैठका झाल्या असल्याचे पंचसदस्य मास्कारेन्हस यांनी सांगितले.

80 कोटींचे काम

राज्य सरकारच्या जलस्त्रोत खात्यातर्फे खांडेपार नदीवरील या बंधाऱ्यासाठी 80 कोटी रुपयांची निविदा देण्यात आली आहे. बंधारा तसेच बराज बांधून हे पाणी प्रियोळ मतदारसंघातील तसेच लगतच्या पंचायतींना पुरवण्यात येणार आहे. हे काम हुबळी येथील एका कंपनीने हाती घेतले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com