
मुरगाव भाजपा महिला मंडळातर्फे निषेध
Dainik Gomantak
वास्को: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल पंजाबमधील फिरोजपूर येथे त्यांचा ताफा रस्त्यावरील उड्डाण पुलावर रोखण्यात आल्याने तसेच काँग्रेसने (Congress) घडवून आणलेल्या या घटनेचा व त्यांच्या कृत्याचा मुरगाव (Murgaon) भाजपा महिला मंडळातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काल पंजाबमधील फिरोजपूर येथे विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी दाखल झाले. मात्र त्यांचा ताफा रस्त्यावरील उड्डाण पुलावर काही शेतकऱ्यांनी अडवल्यामुळे मोदी अचानक दौरा अर्धवट सोडून माघारी परतले. पाऊस आणि खराब हवामान यामुळे पंतप्रधानांनी फिरोजपूर दौरा रद्द केला असे सांगितले जात होते. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबत नेमकी माहिती देण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.पंतप्रधानांचा दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम आणि प्रवासाचे नियोजन याबाबत आधीच पंजाब सरकारला माहिती देण्यात आली होती. त्यानुसार सुरक्षा व अन्य व्यवस्था होणे अपेक्षित होते. पंतप्रधान रस्तामार्गे जाणार हे निश्चित झाल्यावरही या मार्गावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था दिसून आली नाही. त्यामुळेच याबाबत पंजाब सरकारकडून अहवाल मागवण्यात आला आहे.
काँग्रेसने घडवून आणलेली घटना ही त्यांच्या मानसिकतेचे आणि कृत्याचे उदाहरण आहे. लोकांनी वारंवार नाकारल्याने त्यांनी हा चुकीचा मार्ग स्वीकारला आहे. काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी या घटनेबद्दल देशातील जनतेची माफी मागायला हवी असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी म्हंटले असून पंजाब सरकारच्या या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान कालच्या या घटनेचा मुरगाव भारतीय जनता पार्टी महीला मंडळातर्फे निषेध व्यक्त केला. हेडलॅण्ड सडा येथे श्री लक्ष्मीनारायण देवस्थानाकडे या निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दक्षिण गोवा भाजपा महिला सरचिटणीस ॲड. कुणाली मांद्रेकर, मुरगाव महिला मोर्चा अध्यक्ष छाया होनावरकर तसेच इतर भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.पंजाब सरकारने केलेल्या अशोभनीय कृती बद्दल दक्षिण गोवा भाजपा महिला सरचिटणीस ॲड. कुणाली मांद्रेकर यांनी कडाडून टीका केली व निषेध व्यक्त केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.