Vasco : वास्कोतील काही भाग बॉक्साईटच्या भुकटीमुळे प्रदूषित; आमोणकर आक्रमक

एमपीएच्या गेट क्रमांक 9वर वाहतूक रोखली
MLA Sankalp Amonkar
MLA Sankalp Amonkar Dainik Gomantak

MLA Sankalp Amonkar : एमपीए मुरगावच्या लोकांबाबत अतिशय बेजबाबदारपणे वागत असल्याने लोकांना वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. जर एमपीएने स्वत:च्या आदेशाचे पालन केले नाही तर गेट क्र.9 वरून सर्व वाहतूक बंद करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी एमपीएला दिला.

आमोणकर यांच्या इशाऱ्याने गेट क्र.9 वरून सुरू असलेली बाॅक्साईट वाहतूक रोखण्यात आली. मुरगाव बंदरातून कोळसा, बॉक्साईटची अवजड वाहनांतून होणारी वाहतूक गेट क्र. 1 मधून करावी, असा आदेश एमपीएने काढला.

MLA Sankalp Amonkar
Nagoa Accident: दुर्दैवी ! मुलांना शाळेत सोडायला जाताना अपघात; पित्याचा मृत्यू, मुले जखमी

मात्र, एमपीए स्वतःच्याच आदेशाचे पालन करत नसल्याने वास्को शहरातील काही भाग कोळसा व बॉक्साईटच्या भुकटीमुळे प्रदूषित झाले आहेत.

ताडपत्री आवश्‍यक

आज ‘गोमन्तक’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी एमपीएला फटकारले व जर एमपीएने स्वत:च्या आदेशाचे पालन केले नाही तर गेट क्रमांक 9 वरून सर्व वाहतूक बंद करण्यास भाग पाडले जाईल.

एमपीएने काढलेल्या आदेशानुसार सर्व अवजड वाहने गेट क्र. 1 मधून बाहेर पडली पाहिजेत. तसेच ट्रकवर ताडपत्री घालणे क्रमप्राप्त आहे. यापुढे एमपीएचा बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com