म्युझियम ऑफ गोवाचा ‘मोग संडे’ ३१ पासून सुरू

UNI
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील म्युझियम ऑफ गोवाचा (मोग) कोविड महामारीमुळे स्थगित ठेवलेला ‘मोग संडे’ उपक्रम ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. ‘स्टोरीज इन ब्लॉक प्रिंट्स’ ही कार्यशाळा ३१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत घेण्यात येणार आहे.

पणजी - पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील म्युझियम ऑफ गोवाचा (मोग) कोविड महामारीमुळे स्थगित ठेवलेला ‘मोग संडे’ उपक्रम ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. ‘स्टोरीज इन ब्लॉक प्रिंट्स’ ही कार्यशाळा ३१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत घेण्यात येणार आहे. चिंदिया ब्रँडच्या संस्थापक पूजा राजपूत यांच्या सहयोगाने होणाऱ्या या कार्यशाळेत नामवंत अजरख कारागीर इस्माईल खत्री प्रिंटिंग तंत्राची प्रात्यक्षिके दाखवतील.

कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला पुरवल्या जाणाऱ्या स्कार्फवर प्रिंट पॅटर्नस करण्याची संधी लाभणार आहे. अजरख हा एकमेवाद्वितीय असा ब्लॉक प्रिंटिंग प्रकार आहे, जो गुजरात येथील कच्छ भागात सापडतो व त्याची मुळे इंडस व्हॅली सिविलायझेशनमध्ये सापडतात. १६ व्या शतकात खत्री जमात कच्छहून सिंधला स्थलांतरीत झाली. अजरख टेक्स्टाईलवर इस्लामिक प्रभाव आहे. जेव्हा कच्छच्या राजाने या हस्तकलेला मान्यता दिली, तेव्हा त्यांना निर्जनस्थळी स्थायिक होण्यास निमंत्रण दिले. अशी ही दुर्मिळ कला शिकण्याची संधी यानिमित्ताने लाभणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी ९८१९५८७२१२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या