गोव्यातील तरुणाचा पुण्यात गूढ मृत्यू

मृत युवक पुणे येथील फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये घेत होता शिक्षण

FTII Pune
FTII PuneDainik Gomantak

पर्वरी, गोवा येथील सध्या पुणे येथील फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एटीआयआय) या संस्थेत शिकणाऱ्या अश्‍विन शुक्ला (वय 32) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.


FTII Pune
नव्या संसद भवनसाठी गोव्यातील माती नवी दिल्लीत पोहोचली

या संस्थेच्या हॉस्टेलमध्ये शुक्रवारी सकाळी या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. तीन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, आत्महत्या, की घातपात याचा उलगडा शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. गळफास लावलेल्या अवस्थेत अश्‍विन हा आढळून आला होता.


FTII Pune
'Har Ghar Tiranga' यशस्‍वी करण्यासाठी भाजपचे मोर्चे सज्ज

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेने पुणे येथील एटीआयआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी पुण्यातील डेक्कन जीमखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून आता अश्विनच्या मृत्यूचं कारण शोधलं जात आहे.

काय आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ?

FTII 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' ही भारतातील सार्वजनिक प्रसारक दूरदर्शनसाठीची प्रशिक्षण शाखा, जी पूर्वी नवी दिल्ली येथे कार्यरत होती, 1974 मध्ये ती पुण्यात स्थलांतरित झाली. त्यानंतर, संस्थेला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे पूर्ण सहाय्य मिळाले.

नाव बदलासोबतच, FTII ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था बनली, जी गव्हर्निंग कौन्सिल आणि तिच्या नियुक्त संचालकांद्वारे चालवली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com