टाळेबंदीत नडकेचा रस्ता अडकला

Dainik Gomantak
बुधवार, 6 मे 2020

नडके व केरी वाड्यावरील रहिवाश्यानी रस्त्यासाठी जिल्हा पंचायतीच्या निवडणूकावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता लॉकडाऊन काळातही ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे खोतिगावाचे सरपंच उमेश गावकर यांनी सांगितले.

सुभाष महाले

काणकोण

खोतीगाव अभयारण्य कक्षेतील पैगीण पंचायतीतील मार्ली-तिरवाळ व खोतीगाव पंचायत क्षेत्रातील नडके रस्त्याचा प्रश्न करोनामुळे"लॉकडाऊन". झाला आहे.पावसाळ्यापूर्वी मार्ली-तिरवाळच्या रस्त्याची बांधणी करून या प्रश्नावर कायमचा पूर्ण विराम देण्याचे आश्वासन दक्षिण गोव्याचे उपजिल्हाधिकारी अजित रॉय यांनी मार्ली वासीयाची भेट घेऊन दिले होते.त्यावेळी रस्ता नाहीतर जिल्हा पंचायतीच्या निवडणूकीत मतदान नाही अशी भुमिका मार्लीवासीयानी घेतली होती.यापूर्वी येथील रहिवाश्यानी याच मागणीसाठी लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता.त्यासाठी उपजिल्हाधिकारी रॉय व काणकोणचे मामलेदार. विमोद दलाल यांनी मार्ली वासीयाची भेट घेऊन त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला.या भागाचे पंच व पैगीणचे सरपंच जगदीश गावकर तसेच माजी पंच कुष्ठा गावकर यांनी रस्त्याचा प्रश्न पावसाळ्या पूर्वी सोडवण्याचे आश्वासन जिल्हिधिकाऱ्यानी दिल्यानंतर मतदान करण्यास सहमती दर्शवली होती.मात्र करोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने या रस्त्याचा प्रश्न सद्यातरी लॉकडाऊनात सापडला आहे.येथील रहिवाश्याना उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. या वाड्याला पाणी पुरवठा करणारा नैसर्गिक झरीचा स्तोत्र आटत असल्याने येथील रहिवाश्याना नदीच्या पात्रात खड्डे खणून पाणी मिळवावे लागते त्यासाठी या ठिकाणी असलेल्या कूपनलिकेची दुरूस्ती करण्याची मागणी रहिवाश्यानी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. 

लॉकडाऊनमुळे जिल्हपंचायत निवडणूका स्थगित झाल्या आहेत जोपर्यंत वाड्यावरील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणूकावर बहिष्कार घालण्याच्या निर्णयावर वाड्यावरील नागरीक ठाम असल्याचे पंच जगदीश गावकर व माजी पंच कुष्ठा गावकर यांनी सांगितले.

नडके व केरी वाड्यावरील रहिवाश्यानी रस्त्यासाठी जिल्हा पंचायतीच्या निवडणूकावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता लॉकडाऊन काळातही ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे खोतिगावाचे सरपंच उमेश गावकर यांनी सांगितले.

 

Goa Goa Goa

संबंधित बातम्या