Goa: फोंड्यात नागेश महालक्ष्मी नाट्यसमाज संस्‍थेचा 'अमृतमहोत्सव'

कलाकारांनी काम करताना गोमंतकाचा इतिहास नाट्यात परावर्तित करावा.
Kala Mandir Ponda
Kala Mandir PondaDainik Gomantak

नाटक हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरावे यासाठी कलाकारांनी काम करताना गोमंतकाचा इतिहास नाट्यात परावर्तित करावा, असे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले. फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात काल शनिवारी बांदोडा येथील श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज या संस्थेच्या पंचाहत्तराव्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, राजे सौंदेकर घराण्याचे मधुलिंगनागेश वडियार, श्री नागेश संस्थानचे अध्यक्ष दामोदर भाटकर, संस्थेचे अध्यक्ष अजित केरकर व सचिव अरुण काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Kala Mandir Ponda
Vasco: वास्कोतील अकरा दिवसांच्या बाप्पाचे थाटात विसर्जन

आर्लेकर म्हणाले की, एखादी संस्था 75 वर्षे पूर्ण करते ही साधी गोष्ट नाही. एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन एकत्रित आलेल्या कलाकारांचे हे सांघिक यश आहे. गोमंतकीय हा नाट्यवेडा आहे आणि नाटकाप्रती त्‍यांची असलेली निष्ठा परिचित आहे. मधुलिंगनागेश वडियार तसेच दामोदर भाटकर यांनीही संस्थेला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात दास कवळेकर, दिलीप ढवळीकर, चतुरा रायकर, रामदास नाईक, सिद्धी उपाध्ये, प्रभाकर केरकर, शशिकांत नाईक, गायत्री सिद्धये, मंगलदास नाईक, वीणा गावणेकर, सुबोध कुर्पासकर, संतोष केरकर, अशोक नाईक (कलाकार) तसेच सम्राट क्लब कपिलेश्‍वरी, रवळनाथ प्रासादिक नाट्यमंडळ बांदोडा या संस्थांबरोबरच मरणोत्तर गोविंद उपाध्ये, गणपत दाते व नारायण कामत बुडकुले यांचा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Kala Mandir Ponda
Goa Government| विधिमंडळ सचिव, पीआयओना माहिती आयोगाची नोटीस

राजेंद्र आर्लेकर, हिमाचलचे राज्‍यपाल-

नागेश महालक्ष्मी नाट्यसमाज संस्था पंचाहत्तर वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे गोमंतकीयांनी पारतंत्र्यात भोगलेल्या काळाचा इतिहास आता नाट्यरुपात आला पाहिजे.

सुदिन ढवळीकर, वीजमंत्री, संस्थेचे कार्याध्यक्ष-

गावातील सगळे एकत्रित आल्यानंतर चांगले तेच घडते आणि तेच नागेश महालक्ष्मी नाट्य समाजाप्रती घडले आहे. कलाकारांच्या समर्पित वृत्तीमुळेच ही संस्था आता एका वटवृक्षाच्या रूपात साकारली आहे.

मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री-

नागेश महालक्ष्मी संस्थेच्या कलाकारांनी समर्पित वृत्तीने कार्य केल्यामुळे ही संस्था टिकली आणि वाढली. भविष्यातसुद्धा युवा कलाकारांकडून ही संस्था चांगले कार्य करून घेईल हे निश्‍चित.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com