‘नमन गणेशा’ ऑनलाईन कार्यक्रमाला प्रतिसाद

प्रतिनिधी
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

 ‘स्वरांकुर’ या सांस्कृतिक संघाने गणेशचतुर्थीची संधी साधुन ‘नमन गणेशा’ या संगीतमय कार्यक्रमाची निर्मिती केली. या कार्यक्रमाचे शनिवारी फेसबुक व यू-ट्यूबवर प्रथमच प्रसारण करण्यात आले. 

फातोर्डा: ‘स्वरांकुर’ या सांस्कृतिक संघाने गणेशचतुर्थीची संधी साधुन ‘नमन गणेशा’ या संगीतमय कार्यक्रमाची निर्मिती केली. या कार्यक्रमाचे शनिवारी फेसबुक व यू-ट्यूबवर प्रथमच प्रसारण करण्यात आले. 

असंख्य संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. अजुनही हा कार्यक्रम सोशल मीडियावर लोक पाहत आहेत. हजारो संगीतप्रेमींचा या कार्यक्रमाला लाईक प्रतिसाद लाभला. शिवाय अनेकांनी कार्यक्रम आवडल्याचा अभिप्रायही पोस्ट केला आहे.

हा कार्यक्रम शनिवारी सहा वाजता अंबेश जयकृष्ण तळवडकर यांच्या फेसबुक प्रोफाईलवरुन व दिगज बेणे यांच्या यू-ट्युब चॅनलवरून प्रसारीत करण्यात आला. या कार्यक्रमात रिषभ साठे व पृथा सचिन कुंकळयेकर यांनी ‘नमन गणेशा हे प्रथमेशा’, ‘सूर निरागस हो’, ‘दाता तू गणपती’, ‘काळ देहासी आला’, ‘ओंकार अनाधी अनंत’ ही भक्तीगिते गायली. शिवाय या दोघांनी काही नाट्यपदेही सादर केली.

संबंधित बातम्या