पेडणे तालुक्यातील स्थानिक पंचायत मतदार यादीत सीमाभागातील लोकांची नावे!

या लोकांची नावे आपल्या राज्यातील मतदार यादीत सुध्दा असुन जाणुन बुजुन BLO ना हाताशी धरून गोव्यातल्या मतदार यादीत घुसडतात.
Election
Election Dainik Gomantak

पेडणे (Pernem) तालुक्यातील सीमाभागातील अनेक नागरिकांची मतदार यादीत नावे घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे, तो प्रयत्न त्वरित थांबवावा आणि कोणी त्यांची नावे सविस्तर माहिती न घेता घातली त्या blo यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पेडणे तालुका विकास समितीचे अध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी केली आहे. खर तर याला जबाबदार AEO ने (जो मामलेदार प्रमुख आहे) नेमलेले BLO सर्वस्वी जबाबदार आहेत. असा दावा श्री नाईक यांनी केला.

सिमाभागातील लोकांची नावे, पेडणे तालुक्यातील स्थानिक पंचायत मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. मतदार यादीत नाव घुसडुन घेवून हे नागरिक थांबत नाही तर मग रहिवासी दाखला घ्रवून सरकारच्या सर्व योजना परस्पर घेत असतात. सरकारी योजनांचा गैरफायदा घेत असतानाच सरकारी नोकरी सुद्धा ते मिळवतात हा स्थानिक बेरोजगार युवकावर अन्यायच केल्यासारखी ही प्रकाराने आहेत.

Election
मोरजीतील नळ कोरडेच; आमदार दयानंद सोपटे यांच्या हस्ते टँकर द्वारे पाणी पुरवठा

सरकारने नेमलेले बि एल ओ ( BLO's) कानाडोळा करतात. असा दावा व्यंकटेश नाईक यांनी केला आहे. पेडणे तालुका विकास समिती अशा BLO ची चौकशी करून कर्तव्यात कसुराई करून शहानीशी न करता नावे तशीच ठेवली म्हणुन योग्य ती कारवाई करण्यासाठी निवडणुक (Election) अधिकाऱ्याकडे लीखीत तक्रार करणार असल्याची माहिती व्यंकटेश नाईक यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि सिमेलगतची जास्तीत जास्त नावे मतदार यादीत घुसडली आहेत. या लोकांची नावे आपल्या राज्यातील मतदार यादीत सुध्दा असुन जाणुन बुजुन BLO ना हाताशी धरून गोव्यातल्या मतदार यादीत घुसडतात.

त्याला स्थानिक गावपातळीवरील पंचायत निवडणुकीत उभे राहणारी माणसेच जबाबदार आहेत.असा दावा नाईक यांनी केला. परंतु या लोकाना हे समजत नाहीत की मतदार यादीत नावे घुसडुन ही माणसे 15 वर्षाचा रहीवासी दाखला करून घेण्याबरोबरच सरकारी नोकरीसाठी अर्ज करतात आणि भुमिपुत्रांच्या हक्काच्या नोकऱ्या आपणाला मिळवितात अशा रीतीने फक्त एका मतासाठी आपल्याच भुमिपुत्रांना नोकरीपासुन वंचित करून गैरमार्गाने बेकायदेशीर मतदार यादीत नाव घुसडल्याचे दुरगामी परीणाम स्थानिकाना भोगावे लागतात.

यात गावा गावात असणारे BLO जाणुन बुजुन दुर्लक्ष करून ( पैसे घेऊन) नाव मतदार यादीत ठेवतात. खर तर प्रत्येक वर्षी नोव्हेंबर/डीसेंबर मध्ये BLO प्रत्येक मतदाराशी दिलेल्या पत्यावर संपर्क करून शहानीशी करणे क्रमप्राप्त असते. आणि जर तो मतदार वास्तव्य करीत नसेल तर तसा रीपोर्ट तयार करून AEO ला देऊन BLO च्या रीपोर्ट नुसार नाव मतदार यादीतुन कमी करता येते.

स्थानिक बेरोजगार युवकानी हे मर्म जाणुन मामलेदार म्हणजे सहाय्यक निवडणुक अधिकारी Assistant Electroller Officer (AEO) यांच्या लक्षात ही गोष्ट आणुन द्यावी अथवा पेडणे तालुका विकास समितीला सविस्तर माहीती द्यावी. कुणाचेही नाव उघड न करता समिती पुढाकार घेऊन बेकायदेशीर नोंद केलेली नावे डीलीट करण्याबरोबरच सत्य माहीती आपल्या AEO पासुन लपवली आणि कामात कसुरपणा केल्याचा ठपका ठेऊन संबंधीत BLO वर कारवाई करण्याबरोबरच पोलीसात तक्रार करण्यास मागे पुढे पाहणार नाही ही असा इशारा दिला आहे.

Election
बगल राष्ट्रीय महामार्गावरील 'त्या' घरांवर बुलडोझर फिरवण्याचे काम सुरु

समिती पेडणेकार बेरोजगार भुमिपुत्रावर होणारा अन्याय तसेच कृषिखात्यातुन मिळणारे विविध योजनांचा लाभ स्थानिक शेतकऱ्याना वंचित करून मतदार यादीतील निवडणुक ओळख पत्रामुळे भलतेच घेतात हा प्रकार समिती सहन करू शकत नाही. पेडणे तालुका विकास समिती हा बेरोजगार युवकांचा आवाज आहे. दुसरे लोक स्थानिकावर अत्याचार-अन्याय करत असताना स्थानिकांच्या पाठीशी सार्वजनिक समस्याच्या मागे उभी राहणारी असल्याचे व्यंकटेश नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com