मुरगाव मतदारसंघातील मतदारांची सतावणूक

The names of voters in Morgaon constituency have been omitted
The names of voters in Morgaon constituency have been omitted

मुरगाव : मुरगाव मतदारसंघातील काही मतदारांची नावे गाळण्यात आली आहेत त्यानी मामलेदार कार्यालयात दस्ताऐवज सादर करूनही त्यांची सतावणूक केली जात आहे. मुरगाव मामलेदार कार्यालयात या मतदारांच्या अस्तित्वाप्रकरणी सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक मतदार तसेच इतर मतदारांची या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी गर्दी झाली आहे.

मात्र ही सुनावणी संथगतीने सुरू आहे व मतदारांना तिष्ठत दिवसभर सुनावणीची वाट पाहावी लागत आहे. ही सुनावणी गेल्या २२ डिसेंबरपासून सुरू आहे मात्र त्याबाबत गंभीरता नाही.

ज्याने या मतदारांच्या नावांना ऑनलाईनद्वारे हरकत घेतल्याने ती यादीतून गाळण्यात आली आहेत मात्र ती व्यक्तीच नाही. यामागे राजकारण असून हे जाणूनबुजून सुरू आहे. राज्यातील सर्व मतदारसंघात सर्वे करून दिलेल्या पत्त्यावर नसलेल्यांची नावे गाळण्याची प्रक्रिया लागू केलेली नाही मात्र फक्त मुरगाव मतदारसंघातच केली जात आहे. यामागे स्थानिक आमदार व मंत्री असल्याचा आरोप काँग्रेसचे मुरगावचे नेते संक्लप आमोणकर यांनी केला. ही नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट केली जात नाही तोपर्यंत काँग्रेस हा लढा सुरू असणार असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com