Republic Day: नाणूस किल्ल्यावर उद्या साजरा होणार रोमहर्षक क्रांतिदिन सोहळा

26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नाणूस किल्ल्यावर उपस्थित राहून दीपाजी राणे यांच्या क्रांतीला मानवंदना देणार आहेत.
Nanuz Fort, Salcete|Republic Day
Nanuz Fort, Salcete|Republic DayDainik Gomantak

Nanuz Fort Republic Day: 26 जानेवारी 1852 रोजी नाणूस किल्ल्याच्या साक्षीने क्रांतिवीर दीपाजी राणे यांनी गोवा स्वातंत्र्य संग्रामात पहिली सशस्त्रक्रांती पोर्तुगिजांविरोधात सत्तरीत केली. युवापिढीला इतिहासाची जाणीव व्हावी आणि या क्रांतीची मशाल अनेकांच्या मनात सदैव तेवत राहावी,

यासाठी 26 जानेवारी हा दिवस सत्तरी इतिहास संवर्धन समितीतर्फे क्रांतिदिन सकाळी 11.30 वाजता नाणूस किल्ल्यावर साजरा करण्‍यात येणार आहे.

या क्रांतीला आता गोवा सरकारने मान्यता दिली असून येत्या 26 रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत नाणूस किल्ल्यावर उपस्थित राहून दीपाजी राणे यांच्या क्रांतीला मानवंदना देणार आहेत. राष्ट्रभक्तीने प्रेरित असा हा कार्यक्रम आहे.

याबाबत माहिती देताना सत्तरी इतिहास संवर्धन समितीचे समन्वयक ॲड. शिवाजी देसाई म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आमदार असताना त्यांनी सर्व प्रथम क्रांतिवीर दिपाजी राणे यांचे नाव वाळपईच्या सरकारी इस्पितळास द्यावे, या करिता गोवा विधानसभेत ठराव संमत केला होता.

Nanuz Fort, Salcete|Republic Day
Republic Day: पर्वरीत उद्या ‘बलसागर भारत होवो..!’

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे क्रांतिवीर दिपाजी राणे, दादा राणे तसेच सत्तरी तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या इतिहासाचे तैलचित्र गोवा सरकारने गोवा स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवी वर्षात सर्वांसमोर आणले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी सुरवातीपासूनच नाणूस किल्ला संवर्धन मोहिमेस सहकार्य केले आहे.

किल्ल्यावर दीपाजी राणेंचे भव्य दिव्य स्मारक बांधून किल्ल्याचे पुनर्वसन करता येऊ शकते. दिपाजींचे स्मारक हे राष्ट्रीय स्मारक होऊ शकते.

Nanuz Fort, Salcete|Republic Day
Road Transport: मार्ना-शिवोली बाजारातील रस्त्याचे अखेर रुंदीकरण होणार

क्रांतिदिन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सत्तरी इतिहास संवर्धन समितीतर्फे करण्यात आले आहे. मानवंदना कार्यक्रमास किल्ल्यावर जाण्यासाठी बेतकेकरवाडा, नाणूस येथून कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे.

ऐतिहासिक क्षण

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना क्रांतिवीर दिपाजी राणे यांचे पणतू दीपाजी राणे म्हणाले, आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारी आहोत. कारण हा किल्ला आज खऱ्या अर्थाने पारतंत्र्यातून मुक्त होत आहे. आम्हांला मुख्यमंत्र्यांचे सहकार्य नेहमी लाभले आहे. या उपक्रमातून क्रांतिवीरांच्या आठवणी नव्या पिढीपर्यंत पोचतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com