नारायण राणे व मुख्यमंत्री प्रमोद सावंतानी गोमंतकीयांची माफी मागावी: संकल्प आमोणकर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्र भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव सिंधदुर्गच्या लाईफ टायम मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याच्या नामफलकावर न घालुन गोमंतकीय जनतेचा अपमान केला

पणजी: महाराष्ट्र भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नाव सिंधदुर्गच्या लाईफ टायम मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन सोहळ्याच्या नामफलकावर न घालुन गोमंतकीय जनतेचा अपमान केला आहे अशी टिका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केली आहे. 

गृहमंत्री अमित शहा तसेच इतर भाजप पदाधिकारी यांच्या सोबत गोव्याचे मुख्यमंत्री काल मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनास उपस्थित राहिले होते त्यावर प्रतिक्रीया देताना संकल्प आमोणकर यांनी टिका केली आहे. 

गोव्याचे मुख्यमंत्री निमंत्रण नसतानाच सदर कार्यक्रमास उपस्थित राहिले हे त्यांचे नाव नामफलकावर नसल्याने स्पष्ट झाले आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी किमान गोमंतकीयांच्या स्वाभिमानाचा विचार करायला हवा होता असे संकल्प आमोणकर यांनी म्हटले आहे. 

गोव्यातील खाण व्यवसाय सुरू कऱण्यासाठी आंदोलकांकडून सरकारला 15 मार्चचा अल्टिमेटम -

मुख्यमंत्री कदाचीत स्वत:ला केवळ निर्लज्ज भाजप पक्षाचेच समजत असावेत असा टोला संकल्प आमोणकर यांनी हाणला आहे. नारायण राणे व डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांचा अपमान केला असुन, ताबडतोब गोमंतकीयांची माफी मागावी अशी मागणी संकल्प आमोणकर यांनी केली आहे. 

गोव्यात यंदा या दोन शहरांमध्येच होणार कार्निव्हल महोत्सवाचं आयोजन -

संबंधित बातम्या