
Illeagal Red Stone Mining: नार्वे येथील बेकायदा चिरेखाण व्यवसायाबाबत आवाज उठवताच, संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. दुसऱ्या बाजूने खाणींवरील जनरेटर्स आदी मशिनरी गायब झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिरेखाणींवर कोणत्याही क्षणी छापा पडण्याची शक्यता गृहीत धरून संबंधित व्यावसायिकांनी काल रातोरात खाणींवरील जनरेटर्स आदी मशीनरी गायब केल्याची माहिती मिळाली आहे.
डिचोलीतील एक पर्यावरणप्रेमी रमेश गावस यांनी बुधवारी (ता.15) पत्रकारांना सोबत घेऊन या बेकायदा व्यवसायाला वाचा फोडली होती.
अंदाजे तीस चिरेखाणी
नार्वे गावात बेकायदा चिरेखाणींचे प्रस्थ वाढले असून, कोमुनिदाद जमिनीत बेधडकपणे या चिरेखाणी कार्यरत आहेत. या गावात तीसच्या आसपास चिरेखाणी सुरू आहेत.
चिरेखाण व्यावसायिकांनी नार्वे गाव पोखरला असून, संपूर्ण गावात धूळ प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. जलस्रोतांवरही परिणाम झाला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.