Goa CM Dr Pramod Sawant and HM Vishwajit Rane
Goa CM Dr Pramod Sawant and HM Vishwajit Rane

गोव्यातील मुख्‍यमंत्री-आरोग्‍यमंत्री यांच्यातील वाद ‘संतोष’रुपी मध्‍यस्‍थीने मिटला

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) व आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) यांच्यातील वाद गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी नव्हे, तर संघटनेचे राष्ट्रीय संघटनसचिव बी. एल. संतोष यांच्या मध्यस्थीने (Mediated) मिटवण्यात आला, अशी खात्रीलायक माहिती (Convincing information) मिळाली आहे. हा वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक (meeting) सुरू असताना केंद्रिय गृहमंत्र्यांचा दूरध्वनी आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी समन्वयाने काम करण्यासाठी बैठक सुरू असल्याची माहिती त्यांना दिली होती. मात्र ही बैठक संपल्यानंतर शहा यांना दूरध्वनीवर (phone) साऱ्या वादाची माहिती देण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. (National Association The dispute between Goa CM Dr Pramod Sawant and HM Vishwajit Rane was settled through)

मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या वादाबाबत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी केंद्रिय नेतृत्त्‍वाकडे संपर्क साधून माहिती घेतली होती. संघटनसचिव बी. एल. संतोष हे ओडिशा दौऱ्यावर जाणार होते. त्यामुळे हा वाद सोडवण्याचे प्रयत्न दोन दिवस लांबणीवर टाकण्यात आले. ते उपलब्ध झाल्यावर राज्यप्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्स पद्धतीने घेतलेल्या बैठकीत हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्याचे ठरले आणि दुसऱ्याच रात्री मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्याात वाद मिटवण्यावर व एकमेकांविरोधात चुकीचा संदेश जाईल, अशी जाहीर वक्तव्ये टाळण्यावर भर देण्याचे ठऱले असताना मुख्यमंत्र्यांना केंद्रिय गृहमंत्र्यांचा दूरध्वनी आला आणि त्यांना या विषयाची थोडी कल्पना आली. त्यानंतर मात्र त्याना हा साराच विषय 
समजला.

राज्य सरकारची माध्यमे व समाजमाध्यमांवर नाचक्की होत नसल्याने पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर थोडी नाराजी आहे. त्यातच हा वाद उफाळून आल्याने त्यांनी काम करा अन्यथा अशी निर्वाणीची भूमिका घेण्याची तयारी केली होती. तूर्त वाद मिटल्याचे दोन्ही बाजूकडून भासवण्यात येत असले तरी पुन्हा हा वाद उफाळला, तर मात्र राजकीय उलथापालथ ही ठरून गेलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com