Olencio Simoes: ...तर गोव्यात किनाऱ्यावरील सर्व गावे पाण्यात बुडतील

वाळू उत्खननास नॅशनल फिशवर्कर्स फोरमचा विरोध
 CRZ Notification
CRZ NotificationDainik Gomantak

वास्को: नॅशनल फिशवर्कर्स फोरमने सीआरझेड अधिसूचना 2019 मध्ये विशेष सुधारणा प्रस्तावित केल्याबद्दल पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांच्यावर टीका केली आहे. या अधिसूचनेमूळे गोवा राज्याची किनारपट्टी आणि किनारी पर्यावरणाचा नाश होऊ शकतो असे फोरमने टीका करताना म्हटले आहे.

(National Fishworkers Forum opposes amendment to CRZ Notification 2019)

 CRZ Notification
Goa Tourism: UK चे पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल!

नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे सरचिटणीस ओलेन्सिओ सिमॉईस यांनी म्हटले आहे की, नव्या प्रस्तावानुसार वाळू उत्खननास परवानगी देणे, मासे प्रजनन क्षेत्र वगळणे आणि मासेमारी प्रभाग क्षेत्रांमध्ये व्यावसायिक क्रियाकलापांना परवानगी देणे यामुळे केवळ मासेमारी उद्योगच संपुष्टात येणार नाही तर गोव्यातील सर्व किनारी गावे पाण्यात बुडतील. अशी भीती व्यक्त केली आहे.

 CRZ Notification
Goa Train: एक्स्प्रेस रेल्वे गाड्या काणकोणात थांबवा!

ओलेन्सियो यांनी पुढे सांगितले की, केरळमधील अल्लापुझा जिल्ह्यातील थोट्टापल्ली समुद्रकिनाऱ्यावर, ही वाळू खनिजाने समृद्ध होती, परंतु वाळू उत्खननाच्या परिणामामुळे अनेक गावे, हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत आणि शेतीसारख्या इतर अनेक व्यवसायांचा नाश झाला असल्याचा दाखला ही त्यांनी यावेळी दिला आहे. म्हणून नॅशनल फिशवर्कर्स फोरमने राज्य सरकारला इशारा दिला आहे की, प्रस्तावित दुरुस्ती तात्काळ मागे घेण्यात यावी अन्यथा राज्य सरकार स्वतःच येणाऱ्या आपत्तीला जबाबदार असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com