गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धा बेमुदत लांबणीवर

national games
national games

पणजी

कोविड-१९ मुळे गोव्यात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नियोजित असलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा बेमुदत लांबणीवर टाकण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.

देशव्यापी कोरोना विषाणू महामारी प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्पर्धा आयोजन समितीच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेच्या आयोजनाबाबत राज्य सरकार केंद्र सरकारचा सल्ला विचाराधीन घेईल, असे बैठकीनंतर क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी सांगितले.

वारंवार लांबणीवर पडलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत नियोजित होती. ``राष्ट्रीय स्पर्धा आयोजन समितीने कोविड-१९ महामारीमुळे राष्ट्रीय स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आयोजन समितीची पुढील बैठक सप्टेंबरच्या अखेरीस होईल आणि त्यानंतर स्पर्धेच्या तारखा निश्चित करण्यात येतील. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा सल्ला सरकार घेईल. स्पर्धा घेण्यासाठी चार महिने आगावू नोटीस आवश्यक आहे,`` असे क्रीडामंत्री आजगावकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com