आसगावात 11 आणि 12 मे रोजी होणार राष्ट्रीय तांत्रिकी महोत्सव

कल्पनांना वाव: आग्नेल इन्स्टिट्यूटतर्फे आयोजन
आसगावात 11 आणि 12 मे रोजी होणार राष्ट्रीय तांत्रिकी महोत्सव
National Technology FestivalDainik Gomantak

म्हापसा: आसगाव येथील आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड डिझाइन’तर्फे ‘टेक-ऊर्जा’ हा दुसरा राष्ट्रीय तांत्रिकी महोत्सव 11 व 12 मे रोजी होणार आहे. हा महोत्सव नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांना नेहमीच्या शैक्षणिक ताण-तणावांपासून मुक्त करून त्यांच्यामधील सुप्त कलाकौशल्यांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवात विविध विद्याशाखांतील विद्यार्थी सहभागी होणार असून स्पर्धात्मकता आणि सर्जनशीलतेला त्यात महत्त्व दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या गटांत एकात्मता आणि सांघिक भावना वृद्धिगत करणे हाही त्यामागील एक हेतू आहे. नवोन्मेष, तांत्रिकी प्रावीण्य, संशोधनवृत्ती, समस्यांवर मात करण्यास चालना देणे आणि व्यासपीठ न मिळालेल्यांना वाव देणे असेही अन्य हेतू आहेत.

National Technology Festival
बालपणीच सुसंस्कारांचे बीजारोपण करा: सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

https://www.youtube.com/watch?v=k6JKY6IccDwयंदाच्या या महोत्सवाच्या दरम्यान एकूण १५ उपक्रम राबवण्यात येतील. त्यापैकी रोबो-वॉर्स, रोबो-रेस, लाइन फॉलोवर, रोबोट, थ्रीडी मोडेलिंग, कोडिंग इव्हेंट्‍स, प्रोजेक्ट एक्स्पो, स्रिप्टिक क्रॉसवर्ड, बॅटल ग्राउंड, मोबाइल इंडिया, वालोरांत, काउंटर स्ट्राइक व फिफा असे तेरा उपक्रम पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत. त्याशिवाय टॉयकॅथन, क्विझ, नीड टू स्पेंड हे उपक्रम केवळ अकरावी-बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी आहेत.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, याच संस्थेतर्फे 13 व 14 मे रोजी आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवाचेही आयोजन केले आहे. त्यामध्ये कला, संस्कृती व कौशल्य यांचा समन्वय घडवून आणला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.