Goa Fraud Case: गोव्यात बनावट सोने गहाण ठेवून राष्ट्रीयकृत बँकेची फसवणूक...

बनावट सोने गहाण ठेवून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे कर्ज मिळवून राष्ट्रीयीकृत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तीघांना अटक केली आहे.
Fraud Case
Fraud CaseDainik Gomantak

बनावट सोने गहाण ठेवून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे कर्ज मिळवून राष्ट्रीयीकृत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हेमंत रायकर, सोनार आणि गुंडू केळवेकर यांना अटक केली आहे.

(Nationalized bank defrauded by pledging fake gold in Goa)

Fraud Case
Goa Bank: गोवा युको बँकेला अडीच कोटींचा 'गंडा'

राज्यात चोरीचे तसेच फसवणूकीची प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी आर्थिक फसवणूक प्रकरणात मडगावातून पीएफआय कार्यकर्ता अटक करण्यात आली होती. पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून कित्येकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा आरोप असलेल्या फातोर्डा येथील जलीश जेलानी या पीएफआय कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस आणखी एका संशयिताच्या मागावर आहेत मात्र या कारवाईचा सुगावा लागल्या नंतर तो भूमिगत झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

आर्थिक फसवणूक प्रकरणात मडगावातून पीएफआय कार्यकर्ता अटकेत

जैलानी याच्या विरोधात रईस खान नावाच्या व्यक्तीने आपल्याला 5 लाखांचा गंडा घातल्याची तक्रार फातोर्डा पोलिसांत दिली. त्यानुसार आज मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. जैलानी याचे फातोर्डा येथे एक कार्यालय असून याच कर्यालयात हा पैशांचा व्यवहार झाल्याचे सांगण्यात येते. एकूण पाच जण भागीदारीत हे फर्म चालवीत होते अशी माहिती प्राप्त झाली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com