संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या गोव्यात; समुद्रात INS विक्रांतवर होणार नौदलाची कॉन्फरन्स

परिषदेच्या पहिल्या दिवशी समुद्रात प्रात्यक्षिक देखील होणार आहेत.
Naval Commanders' Conference of 2023
Naval Commanders' Conference of 2023Dainik Gomantak

नौदल कमांडर्ससाठी लष्करी-सामरिक पातळीवर सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, नौदल कमांडर्स परिषद 2023 चा पहिला टप्पा 06 मार्चपासून सुरू होत आहे. परिषदेचा पहिला टप्पा समुद्रात आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रथमच भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका, आय एन एस विक्रांत जहाजावर ही परिषद होणार आहे.

परिषदेच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गोव्यात हजेरी लावणार असून, ते आय एन एस विक्रांतच्या नौदल कमांडर्सना संबोधित करतील.

06 ते 23 मार्च याकाळात ही परिषद होणार आहे. संरक्षण कर्मचारी प्रमुख आणि भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल प्रमुख पुढचे काही दिवस नौदल कमांडर्सशी संवाद साधतील. देशाचं संरक्षण, भारताच्या राष्ट्रीय हितासाठी समन्वय आणि तत्परता साधण्याच्या हेतूने या तिन्ही सेवांमध्ये सामायिक वातावरण आणि त्रि-सेवा वाढवण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी समुद्रात प्रात्यक्षिक देखील होणार आहेत.

नौदल कर्मचारी प्रमुख इतर नौदल कमांडरसह भारतीय नौदलाने गेल्या सहा महिन्यांत हाती घेतलेलं प्रमुख ऑपरेशन, युद्धसामग्री, व्यूहशास्त्र, मानव संसाधन विकास, प्रशिक्षण आणि प्रशासकीय उपक्रमांचा आढावा घेतला जाणार आहे. परिषदेदरम्यान, नौदल कमांडर्सना 22 नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलात कार्यान्वित करण्यात आलेल्या 'अग्निपथ योजने'बाबत देखील माहिती दिली जाईल.

Naval Commanders' Conference of 2023
वास्को ते पणजी जेट्टीवरून संभ्रम ; खासदार, पंतप्रधान शुभेच्छा देऊन झाले मोकळे
Naval Commanders' Conference of 2023
Naval Commanders' Conference of 2023Dainik Gomantak

भारताच्या वाढत्या सागरी हितसंबंधांच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांमध्ये नौदलाने आपल्या मोहिमांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. आपल्या सागरी हितसंबंधांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदलाच्या कार्यदक्षतेबाबतही यावेळी अधिकारी विचारविनिमय करतील. भारतीय नौदल युद्धतत्पर, विश्वासार्ह, एकसंध आणि भविष्यकालीन समस्यांना तोंड देण्यासाठी सज्ज असण्यावर सातत्यानं लक्ष केंद्रित करत असून देशाच्या सागरी सुरक्षेची हमी वाहणारा या नात्याने आपल्या कटिबद्धतेचं कर्तव्यदक्षतेनं पालन करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com