नौदलाने वाचविला पणजी पुलावरून पडलेल्या त्या महिलेचा जीव

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोजने मंगळवारी पणजी पुलावरून गोव्यातील मंडोवी नदिमध्ये पडलेल्या एका महिलेचे प्राण वाचवले

पणजी:  भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोजने मंगळवारी पणजी पुलावरून गोव्यातील मंडोवी नदिमध्ये पडलेल्या एका महिलेचे प्राण वाचवले, अशी माहिती काल बुधवारी नेव्ही अधिकाऱ्यांनी दिली. पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दुपारी घडली. ही महिला 30 वर्षाची होती.

आपल्या नित्यनियमीत कामानिमित्त चाललेल्या नौदलातील मरीन कमांडो यांना ती महिला पणजीच्या पुलावरुन नदीत पडताना दिसली,  या कमांडोने त्वरित बोट घटनास्थळी वळविली आणि बोट मधील एका कर्मचाऱ्याने त्या महिलेला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि त्या महिलेचे प्राण वाचविले अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली.

त्या महिलेला बोटीवर आणून जवळच्या नौदलाच्या जेट्टीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्या महिलेची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पणजीपुलावरून या महिलेने का उडी मारली याचे कारण शोधण्यासाठी या महिलेची चौकशी केली जात आहे, असे पणजी पोलिसांनी सांगितले.

या विकेन्डला गोव्याला जाताय? जाणून घ्या विमानांचे वधारलेले दर -

संबंधित बातम्या