जुने गोवेत रेल्वेच्या धडकेमुळे नौदल अधिकारी व एका महिलेचा मृत्यू

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 एप्रिल 2021

धावजी मार्ग - जुने गोवे येथे काल मध्यरात्री रेल्वे पुलावरून चालत जाणाऱ्या दोघां पर्यटकांना रेल्वेची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मडगाव : धावजी मार्ग - जुने गोवे येथे काल मध्यरात्री रेल्वे पुलावरून चालत जाणाऱ्या दोघां पर्यटकांना रेल्वेची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. रेल्वेची धडक बसल्याने राहुल कुमार या रांची येथील अठ्ठावीस वर्षीय नौदल लेफ्टनंटचे व रेल्वेची धडक बसल्याने नदीत पडलेल्या  मोमी गांगुली (27 वर्षे) या महिलेचे निधन झाले.  

काल मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. राहुल कुमार  हे मोमी गांगुली व भास्कर घोष (दोघेही कोलकाता) यांच्या सोबत गोवा दर्शनसाठी आले होते.  गोव्यात ते पहिल्यांदाच आले होते. दिवसभरात त्यांनी राजभवन परिसर, पणजी येथील मोंत चर्चला भेट दिली व रात्री धावजी मार्ग - जुने गोवे येथे नदीवर असलेल्या रेल्वे पुलाच्या मार्गावरून ते चालत निघाले होते. त्याच वेळी करमळी - मडगाव दिशेने रेल्वे आली. रेल्वेचा धक्का चुकवण्यासाठी भास्कर रेलमार्गाच्या एका बाजुस त राहुल व मोमी दुसऱ्या बाजुला थांबले. तथापि, रेल्वेची राहुल व मोमी यांना धडक बसली. यात राहुल रेलमार्गावर पडला तर मोमी धडकेमुळे मांडवी नदीत पडली. किनारी पोलिस व नौदलाच्या हेलिकाॅप्टरच्या मदतीने मोमी यांचा मृतदेह पाण्यातून वर काढण्यात आला. 

 कोकण रेल्वे पोलिसांनी राहुल कुमार याच्या मृत्यूची अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली आहे, नदीचा परिसर जुने गोवे पोलिसांच्य हद्दीत येत असल्याने मोमी यांच्या मृत्यू प्रकरणाची जुने गोवे पोलिसांनी नोंद केली. 

विजयी मानसिकता आवश्यक : ब्रुनो कुतिन्हो 

संबंधित बातम्या