डिचोलीत नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

विविध देवस्थानात कीर्तनादी कार्यक्रमांचे आयोजन
डिचोलीत नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ
Navratri festival डिचोलीत नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ Dainik Gomantak

डिचोली: घटस्थापना आदी पारंपरिक धार्मिक विधींसह डिचोलीतील Dicholim विविध देवस्थानात आजपासून (गुरुवारी) मार्गदर्शक नियमांचे पालन करून नवरात्रोत्सवाला Navratri Festival उत्साहात प्रारंभ झाला आहे. येत्या गुरुवारपर्यंत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार असून, सध्या सर्वत्र या उत्सवाची धूम सुरु झाली आहे.

Navratri festival डिचोलीत नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ
मुख्यमंत्री सावंत यांचा तृणमुलला टोला

गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा, वन येथील श्री कालिका महामाया, बोर्डे येथील श्री रवळनाथ महामाया, धुमासे येथील श्री सातेरी पुरमार, पिळगाव येथील श्री शांतादुर्गा, आदी विविध प्रमुख देवस्थानात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त धार्मिक विधींसह भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध देवस्थानात मखरोत्सवही साजरा करण्यात येणार आहे. गावकरवाडा येथील शांतादुर्गा देवस्थानात कुंकूमार्चन विधीही होणार आहे.

Navratri festival डिचोलीत नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ
ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते अनिल चोडणकर यांचा सत्कार

श्री शांतादुर्गा देवस्थान

गावकरवाडा-डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात वार्षिक नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. सकाळी देवस्थानच्या चार चौगुलेकडून देवीस अभिषेक करण्यात आल्यानंतर विविध धार्मिक विधींसह पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात करण्यात आली. नवचंडी झाल्यानंतर आरती व तिर्थप्रसाद झाला.

नवरात्रोत्सवानिमित्त 'शतचंडी महोत्सव' साजरा करण्यात येणार असून, नऊही पुणे येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रामनाथ रामचंद्र अय्यरबुवा यांचे कीर्तन होणार आहे. या देवस्थानात दुर्गा मातेच्या मूर्तीसह नऊ रूपातील मूर्तींचे पूजन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com