राज्यात आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

आज अश्विन शुक्ल प्रतिपदा, म्हणजेच घटस्थापना अर्थात नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस, आजपासून गोव्यात सर्वत्र नवरात्रोत्सव सुरू होत आहे. दरम्यान, राज्यातील सर्व मंदिरात हा उत्सव साजरा होणार असला तरीही भाविकांना मंदिरात जाण्यास बंदी असल्याने आपल्या आवडत्या देवतेचे दर्शन घेऊ न शकल्यामुळे भाविकभक्त हीरमुसले आहे

पणजी : आज अश्विन शुक्ल प्रतिपदा, म्हणजेच घटस्थापना अर्थात नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस, आजपासून गोव्यात सर्वत्र नवरात्रोत्सव सुरू होत आहे. दरम्यान, राज्यातील सर्व मंदिरात हा उत्सव साजरा होणार असला तरीही भाविकांना मंदिरात जाण्यास बंदी असल्याने आपल्या आवडत्या देवतेचे दर्शन घेऊ न शकल्यामुळे भाविकभक्त हीरमुसले आहे. परंतु अस असल तरीही आनंदाची बाब अशी की,  मंदिरातील पारंपारिक मखरोत्सव भक्तांना ऑनलाईनद्वारे पाहता येण्याची सोय करण्यात आलेली आहे.

गोव्याच्या उत्सव परंपरेतील मानाचे स्थान असलेल्या नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. कोरोना महामारीचा वाढता फैलाव बघता मंदिरे खूली करण्यास अद्याप परवाणगी देण्यात आलेली नाही. मंदिरात भाविकांची गर्दी करण्याची शक्यता लक्षात घेऊन बहुतांश मंगिरीमध्ये पारंपारिक पध्दतीने हा उत्सव होणार आहे. मात्र भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही

. राज्यात आज अनेक मंदिरामध्ये घटस्थापना तसेच नवरात्रौत्सवानिमित्त धार्मिक कार्याला सुरवात झाली आहे. वार्षिक कीर्तन परंपरेस अनेक मंदिरांनमध्ये यावर्षी खंड पडणार आहे. पण यंदा अनेक मखरोत्सव ऑनलाईनद्वारे पाहता येईल, अशी व्यवस्था मंदिर समित्यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवरात्रीच्या शुभ मुहुर्तावर गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेच. "या कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात या समस्येवर मात करण्यासाठी मॅा दुर्गेकडे बळ आणि धैर्य प्रदान करो अशी प्रार्थना करतो," असे मुख्यमंत्री जनतेला शुभेच्छा देतांना बोलले.  

संबंधित बातम्या