'निवेदन' क्लबतर्फे नवाब शेख आणि संगीत शिक्षक शरद मठकर यांचा सत्कार

नवेवाडे येथील "निवेदन" या सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्लबच्या वतीने 'सुर नवा ध्यास नवा' फेम नवाब शेख आणि संगीत शिक्षक शरद मठकर यांचा नवरात्र उत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला.
Nawab Shaikh and music teacher Sharad Mathkar felicitated by Nivedan club
Nawab Shaikh and music teacher Sharad Mathkar felicitated by Nivedan clubDainik Gomantak

नवेवाडे येथील "निवेदन" या सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्लबच्या वतीने 'सुर नवा ध्यास नवा' फेम नवाब शेख आणि संगीत शिक्षक शरद मठकर यांचा नवरात्र उत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला.

यंदाचा हा वार्षिक नवरात्रोत्सव साजरा करत असलेल्या निवेदन या सांस्कृतिक आणि क्रीडा क्लबला 17 वर्षे पूर्ण होत आहे. यावर्षी सरकारी हायस्कूलच्या मागे दुर्गादेवीचे पूजन करण्यात आले आहे.

Nawab Shaikh and music teacher Sharad Mathkar felicitated by Nivedan club
Goa Government Schools : सरकारी शाळांच्या स्थितीस सरकारच जबाबदार; बर्डेंचा निशाणा

दरम्यान नवरात्र उत्सवाचे अवचित्य साधून निवेदन तर्फे 'सुर नवा ध्यास नवा' फेम नवाब शेख आणि त्यांचे संगीत शिक्षण शरद मठकर यांचा सत्कार निवेदनचे जेष्ठ सदस्य महेश कोरगावकर व साळगावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

याप्रसंगी निवेदनचे संस्थापक तथा मुरगाव पालिका प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक सुदेश भोसले, दीपक नाईक, मंगलदास नार्वेकर, नागेश वेरेकर, बिपिन सावंत, श्याम मयेकर, मारुती आरोलकर, दीपेश नाईक, औदुंबर परब, हर्षदा धुरी, रामदास नाईक आदी उपस्थित होते.

तरुण पिढीने जीवनातील आव्हाने स्वीकारून कधीही हार मानू नये. आयुष्यातील आव्हाने स्वीकारल्यास यश तुमच्या हातात असेल. मला माझ्या शिक्षक आणि पालकांचा अभिमान आहे. ज्यांनी मला नेहमीच निराश न होता पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली, असे मत कार्यक्रमादरम्यान नवाब याने व्यक्त केले.

याप्रसंगी शरद मठकर, महेश कोरगांवकर, आपा साळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदेश भोसले यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com