Vasco: सुर नवा,ध्यास नवा' महाअंतिम फेरीत दाखल झालेल्या नवाब शेखचा गौरव

वास्कोच्या नवाब शेखचा हॉटेल सुप्रीम व्यवस्थापनातर्फे गौरव करण्यात आला
Nawab Sheikh
Nawab Sheikh Dainik Gomantak

वास्को: 'सुर नवा, ध्यास नवा' या महाअंतिम फेरीत प्रवेश केलेल्या वास्कोच्या नवाब शेखचा हॉटेल सुप्रीम व्यवस्थापनातर्फे गौरव करण्यात आला. 'कलर्स मराठीचा सुर नवा, ध्यास नवा' या रियालिटी शोमध्ये वास्को बायणा येथील नवाब शेख याने महाअंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ही महाअंतिम फेरी येत्या शनिवारी व रविवारी संगीत प्रेमींना पहायला मिळणार आहे.

(Nawab Sheikh who entered the grand finale of the Sur Nava Dhyas Nava program)

Nawab Sheikh
'Friendship Moto Cup: आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे दोन रायडर्स होणार सहभागी

कलर्स मराठीच्या 'सुर नवा, ध्यास नवा' या रियालिटी शोच्या पाचव्या भागात झळकण्याची संधी नवाब शेख या उमदा गायक कलाकाराला मिळाली व गोव्यातील श्रोत्यांना आपल्या मातीतील कलाकारांची गायकी ऐकण्याचे भाग्य लाभले आहे. नवाब शेख यांनी कलर्स या रियालिटी शोमध्ये पाऊल ठेवून रंगमंचाची पायरी चढताच आपल्या गायकीने परीक्षक आणि संगीत स्रोते यांची मने जिंकून आपली छाप पाडली आहे. त्यांनी आता अंतिम फेरीतून महाअंतिम फेरी गाठली आहे.

Nawab Sheikh
Revolutionary Goans: पक्षांतर करणाऱ्या आमदारांनी देवांनाच गहान ठेवले

या महाअंतिम फेरीत एकापेक्षा एक गायक कलाकार आपली कला श्रोत्यासमोर तसेच महान गायकासमोर जे परीक्षकांची जबाबदारी स्वीकारणार आहे, आपली कला पेश करणार आहेत. कालच्या रविवारी रात्री झालेल्या शोमध्ये गोव्याच्या तसेच वास्कोच्या नवाब शेखने महाअंतिम फेरीत प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले. येत्या शनिवारी व रविवारी रात्री या सातही गायक कलाकारांची महाअंतिम फेरी श्रोत्यांना अनुभवायास मिळणार आहे.

दरम्यान युवा गायक नवाब शेख याने गायन क्षेत्रात गोव्याचे नाव उज्वल केल्याबद्दल वास्को येथील सुप्रीम हॉटेल व्यवस्थापना तर्फे गौरव करण्यात आला. यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक समीर पालेदार नवाब शेख यांचे संगीत क्षेत्रातील गुरु शरद मठकर, मुरगावचे नगरसेवक सुदेश भोसले, युवा उद्योजक तुळशीदास फळदेसाई व हॉटेलचे कामगार वर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्वांचे स्वागत समीर पालेदार तर सूत्रसंचालन नजमा खान तर आभार प्रदर्शन संदीप आचरेकर यांनी केले. येत्या रविवार दि. 25 रोजी कलर्ल मराठीवर महाअंतिम फेरी रात्री दाखवण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com