फुटबॉलसाठी चर्चिल यांची राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला दांडी?

चर्चिल आलेमाव आपली कन्या वालांका आलेमाव हिच्यासह तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याच्या विचारात
फुटबॉलसाठी चर्चिल यांची राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला दांडी?
NCP MLA Churchill Alemao absent for football from ncp program Dainik Gomantak

मडगाव: राष्ट्रवादीचे (NCP) गोव्यातील (Goa) एकमेव आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांच्या बाणावली मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकारिणीची राष्ट्रीय बैठक काल झाली. मात्र, त्या बैठकीला फुटबॉलचे (Football) कारण सांगून दस्तुरखुद्द चर्चिलच गैरहजर राहिल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. खरेच चर्चिलने फुटबॉलसाठीच या बैठकीला दांडी मारली?, असा सवाल विचारला जात आहे.

NCP MLA Churchill Alemao absent for football from ncp program
चर्चिल आलेमाव यांची तृणमूल प्रवेशासाठी बाणावलीत चाचपणी

सध्या चर्चिल आलेमाव यांनी आपली कन्या वालांका आलेमाव हिच्यासह तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार सुरू केला आहे, अशी चर्चा चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारला जात आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौझिया खान यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा हे उपस्थित होते.

29 नोव्‍हेंबरपर्यंत युती शक्य

चर्चिल राष्ट्रवादी सोडणार का? असे त्यांना विचारले असता, त्यांनी युती संदर्भात घोषणा करण्यासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. याचा अर्थ 29 नोव्हेंबरपर्यंत तरी ते या पक्षात आहेत. त्यांचा निर्णय काय? हे कळण्यासाठी तोपर्यंत वाट पाहावी लागेल, असे ते म्हणाले. काँग्रेस - राष्ट्रवादी युती होणार का? असे त्यांना विचारले असता, राष्ट्रीय नेत्यांनी तसे संकेत दिले. मी स्वतः दिनेश गुंडू राव यांच्याशी बोललो आहे. त्यांनीही सकारात्मक उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वकाही नावेली उमेदवारीवर?

चर्चिल आलेमाव यांनी यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात युती होणार की नाही, हे जाणून घेण्यासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. जर युती झाल्यास त्यांना स्वतःला बाणावली आणि वालांकासाठी नावेलीची जागा हवी आहे. मात्र, नावेलीच्या जागेला विरोध होण्याची शक्यता असल्याने त्यांनी तृणमूलचा पर्याय खुला ठेवला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही त्याची कल्पना यापूर्वीच दिली आहे.चर्चिल

NCP MLA Churchill Alemao absent for football from ncp program
चर्चिल ब्रदर्सचा पहिला विजय..!

काल पोलिस कप फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना होता आणि गोवा फुटबॉल संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मला तिथे उपस्थित राहणे आवश्यक होते. त्यासाठीच मी या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. मी याची कल्पना जुझे फिलिप डिसोझा यांना दिली होती.

-चर्चिल आलेमाव, राष्‍ट्रवादी काँग्रेस आमदार.

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या बैठकीचे आमंत्रण आम्ही चर्चिल आलेमाव यांना दिले होते. मात्र, त्यांनी फुटबॉल सामन्याला आपणास हजर राहायचे, आहे, असे सांगितले होते.

- जुझे फिलीप डिसोझा, राष्‍ट्रवादी काँग्रेस

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com