'भाजपने गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकातील सरकार पाडलं, पण...' NCP आमदाराचे ते ट्विट चर्चेत

कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत देत भाजपच्या "खरेदी विक्रीच्या" धोरणाला मूठमाती दिली,
Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023 Dainik Gomantak

Karnataka Election Result 2023: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने 136 जागंवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर, गतवेळी सत्तेला असलेल्या भाजपला केवळ 65, जनात दल (स) 19 आणि इतर चार जणांना विजय मिळवता आला आहे. भाजपने कर्नाटकात सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. पण, काँग्रेसने स्थानिक नेतृत्व, राज्यातील मुद्दे आणि राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा यामुळे काँग्रेसने बहुमताचा गाठला.

काँग्रेसच्या या विजयावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट चर्चेत आहे.

काय म्हणाले आमदार जितेंद्र आव्हाड?

'कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र ही 4 राज्ये भाजपने खोक्यांचा वापर, तसेच केंद्रीय यत्रणांच्या दहशतीचा वापर करून पाडली.'

परंतु कर्नाटकच्या विजयाने सिद्ध झालं की,

'लोकांना सुडाच राजकारण आवडत नाही. आणि त्यामुळेच कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत देत भाजपच्या "खरेदी विक्रीच्या" धोरणाला मूठमाती दिली, हाच या विजयाचा अन्वयार्थ आहे.'

Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसला ‘संजीवनी’; कमळ कोमेजले

'आज सामान्य जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे. परंतु यावर काहीच न बोलता, द्वेष आणि फक्त द्वेष पसरवण्याच काम सत्ताधारी गटाकडून सुरू आहे. पैश्याचा, खोक्यांचा वारेमाप वापर करून, प्रसंगी केंद्रीय यत्रणांना हाताशी धरून सत्तेचा जो माज सत्ताधारी गटाला चढला होता,तो माज मात्र सामान्य जनतेच्या नजरेत खुपत होता. लोकांनी त्यांचा हा राग मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला.'

इतिहास ये दोहराता है की,

नफरत के आगे हमेशा प्यार ही जीतता है..

तुम नफरत फैलाव,हम प्यार ही बाटेगे..!

असेही आव्हाड यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले आहे.

Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023: मोदींच्या 'मिशन साऊथ' ला मोठा धक्का, 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक?

दरम्यान, उत्तर भारत, पश्चिम भारताबरोबरच मध्य भारतातही भाजपने त्यांची सत्ता अबाधित ठेवली आहे. मात्र दक्षिणेत कर्नाटक राज्या हातातून निसटल्याने,  भाजप (BJP) आता दक्षिण भारतातील राज्यांतील सत्तेतून बाहेर झाले आहे. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी हे सर्वात मोठे आव्हान ठरु शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com