मडगावात लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

गोव्यात राजकीय विस्ताराचे प्रयत्न चालवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मडगावात लवकरच कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. 

मडगाव: गोव्यात राजकीय विस्ताराचे प्रयत्न चालवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मडगावात लवकरच कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. 
वार्का येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणावलीचे आमदार आलेमाव यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी पणजी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाच्या उद्‍घाटनासाठी बाणावली व नावेली मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. इतर मतदारसंघांतील कार्यकर्त्यांनी या कायर्क्रमात आपल्यास निमंत्रण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मडगावात लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय सुरू करण्यात येणार असून या कार्यालयाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हा, असे सांगून या कार्यकर्त्यांना आपण समजावल्याचे आलेमाव यांनी सांगितले. 
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभा दक्षिण तसेच उत्तर गोव्यात उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे आलेमाव यांनी जाहीर केले 
होते. 
जिल्हा पंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर व दक्षिण गोव्यात मिळून पाच उमेदवार उभे केले आहेत.

संबंधित बातम्या