सनबर्न फेस्टीवलच्या अडचणीत वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

हणजूण-वागातोरच्या समुद्रकिनारी यंदा सरकारकडून सनबर्न संगीत रजनीचे आयोजन करण्याचा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून त्याचा जोरदार विरोध करण्यात येणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी म्हापशात सांगितले.

म्हापसा :  हणजूण-वागातोरच्या समुद्रकिनारी यंदा सरकारकडून सनबर्न संगीत रजनीचे आयोजन करण्याचा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून त्याचा जोरदार विरोध करण्यात येणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी म्हापशात सांगितले. स्थानिक लोकांच्या मदतीने फेस्टीवलच्या सभास्थळी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

दत्तवाडी येथील इंद्रधनुष्य सभागृहात आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत बर्डे बोलत होते. यावेळी पक्षाचे सल्लागार दिगंबर शिरोडकर, बलभीम मालवणकर, अनिल केरकर, सय्यद कौपीसर, तसेच रियाज शेख उपस्थित होते. देशातून ‘कोविड-१९’चे संकट गेलेले नाही. देशातील बहुतेक मंदिरे तसेच मस्जिद भाविकांसाठी खुल्या करण्यात आलेल्या नाहीत, असे आसताना गोव्यात सनबर्नसारख्या अतिभव्य संगीत रजन्यांचे आयोजन करून सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केले. 

बोडगेश्वर शेतकरी संघटनेकडून मंगळवारी सकाळी मोपा येथील धनगर बांधवांच्यावस्तीत धडक मारल्यानेच त्यांचे गोठे पाडण्याची हिंमत स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांना झाली नसल्याचे बर्डे यांनी नमूद केले. मात्र, धनगर बांधवाच्या गुरांची यथायोग्य सोय करण्यात आल्याशिवाय तेथील गोठे हटवू न देण्याचा निर्धार शेतकरी संघटनेकडून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या