राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष पंचायत निवडणुकीवर

अमिर जेतपुरवाला : राज्य युवा कार्यकारिणीची निवड; नव्या चेहऱ्यांना संधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष पंचायत निवडणुकीवर
Goa NCPDainik Gomantak 

पणजी: राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. राज्य युवा कार्यकारिणीची केलेली निवड ही कायमस्वरुपी राहणार नाही, दर तीन महिन्याला कार्यकर्त्यांच्या कामगिरीनुसार बदल केला जाणार आहे. पक्षाचे जुने चेहरे बदलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे सरचिटणीस तथा गोवा प्रभारी अमिर जेतपुरवाल यांनी दिली.

(NCP's focus on Goa Panchayat elections)

Goa NCP
वडील म्हणाले, भिऊ नकोस, मी आहे पाठीशी.!

बांबोळी येथील तारांकित हॉटेलमध्ये आज शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर जेतपुरवाला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा, युवा प्रदेशाध्यक्ष सतीश नारायणी, उपाध्यक्ष अविनाश भोसले, प्रीतम नाईक आदी मान्‍यवर उपस्थित होते. दरम्‍यान, याप्रसंगी निवडलेल्या गट समितीच्या अध्यक्षांना नियुक्तिपत्रांचे वितरण करण्‍यात आले.

विधानसभा निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. परंतु आता 40 पैकी 16 ठिकाणी गट स्थापन केले आहेत. दोन महिन्यांत उर्वरित सर्व मतदारसंघांत गट समित्यांची स्थापना पूर्ण करू. पक्षबांधणी करून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ. - जुझे फिलिप डिसोझा, राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com