डिचोलीत 'मॉक ड्रिल' ला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) 'मॉक ड्रिल' अर्थातच संकटकालीन बचाव प्रशिक्षणाला डिचोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे
डिचोलीत 'मॉक ड्रिल' ला उत्स्फूर्त प्रतिसाद
NDRF mock drill in BicholimDainik Gomantak

डिचोली: राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) 'मॉक ड्रिल' अर्थातच संकटकालीन बचाव प्रशिक्षणाला डिचोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे . डिचोली उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार कार्यालय यांच्या सहकार्याने मये तलावात हे 'मॉक ड्रिल' पार पडले. या प्रशिक्षणावेळी एनडीआरएफचे अधिकारी आणि जवानांनी आपत्कालीन संकटावेळी साधनांचा वापर करून बचावकार्य कसा करावे त्यासंदर्भात प्रात्यक्षिके करून दाखविले. या ''मॉक ड्रील'वेळी उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, डिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, बार्देशचे संयुक्त मामलेदार संदीप गावडे, डिचोलीच्या संयुक्त मामलेदार अपूर्वा कर्पे उपस्थित होत्या. त्यांच्यासह पोलिस, अग्निशमन दल तसेच विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तत्पूर्वी येथील दीनदयाळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात एनडीआरएफचे अधिकारी राज कुमार यांनी मार्गदर्शन केले.

NDRF mock drill in Bicholim
विठ्ठलापूर शाळेत शारदोत्सवाला प्रारंभ

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com