आगशी- कुठ्ठाळी वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय आवश्यक - मायकल लोबो

''सरकार आवश्यक ती पावले का उचलत नाही ?''
आगशी- कुठ्ठाळी वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय आवश्यक - मायकल लोबो
Michael LoboDainik Gomantak

पणजी: आगशी- कुठ्ठाळी मार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडीची समस्या याचा गोमंतकियांना सामना करावा लागतो आहे. प्रामुख्याने कार्यालये सुरु होणे. आणि कार्यालये सुटणे या वेळेमध्ये रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढते. याचा परिणाम म्हणून वाहतूक कोंडी सारख्या समस्या उद्भवतात. या वाहतूक कोंडी समस्येचा विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना ही करावा लागला आहे.

Michael Lobo
डिचोलीत जलवाहिनी फुटली...

या पार्श्वभूमीवर मायकेल लोबो यांनी आगशी- कुठ्ठाळी मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर राज्य सरकारला कायमस्वरूपी उपाय काढणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना लोबो यांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी बॅरिकेड्स लावण्याचा कायमस्वरूपी उपाय वाहतूक पोलिसांनी काढावा, असेही ते म्हटले आहे.

Michael Lobo
राज्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले

लोबो यांच्या म्हणण्यानुसार या मार्गावर फार कमी वाहतूक पोलिस तैनात केले आहेत. अनेक प्रवासी चुकतात ज्याच्यामूळे या भागातील वाहतूक कोंडीमुळे गोंधळ निर्माण होत आहे. तसेच पुलाचे काम थांबवले असेल, तर वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांना का बसत आहे ? यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार आवश्यक ती पावले का उचलत नाही ? असा सवाल ही लोबो यांनी केला.

तासन् तास वाहतूक कोंडीत अडकलेला टॅक्सी चालकाने सांगितले की, झुआरी ब्रिजवर पर्यटक बसच्या बिघाडामुळे ही गर्दी झाली होती. यामुळे इतर सर्व वाहतुकिची कोंडी झाली होती. तसेच या मार्गावर एखादे वाहन जरी बंद झाले तर त्यामुळे मार्गावरील सर्व वाहने मार्गस्त होण्याला खुप वेळ लागतो. आणि असा एखादा प्रकार घडला तरी प्रवाशांना बराच वेळ ताटकळत उभे रहावे लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com