वीजखांबावरून पडून अपघात टाळण्यासाठी बकेट क्रेनची गरज

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

वीज दुरुस्तीचे काम करताना आज पर्यंत पेडणे तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण राज्यभर असे अधूनमधून अपघात होत असातात.त्यासाठी बकेट असलेली क्रेन,खाली जाळ्याची सोय किंवा अत्याधुनिक उपाय योजना करणे गरजेचे आहे.

 पेडणे :  दाडाचीवाडी - धारगळ  येथे  सव्वा महिन्या अगोदर ट्रांसफॉर्मरवर दुरुस्तीचे काम करताना दोन खाजगी कंपनीच्या कामगाराना वीजेचा धक्का बसल्यामुळे व त्यानंतर  ता. २७ आक्टोबर रोजी सुकेकुळण येथे सुभाष अमेरकर हा  लाईनमन दुरुस्तीच्या कामासाठी खांबावर चढला असता पडुन मृत्यू झाला.या अगोदरही वीज दुरुस्तीसाठी खांबावर वीज लाईन मन चढले असता  अपघाताच्या  घटना घडलेल्या आहेत. यामुळे वीज दुरुस्तीसाठी  खांबावर चढणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेविषयीचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

वीज दुरुस्तीसाठी जे लाईनमन वीज खांबावर चढतात ते शिडीचा वापर करुन.उच्च दाबाच्या खांबांची उंची सुमारे बारा मीटर अन्य वीजेच्या खांबांची उंची आठ मीटर वैगेरे असते. काही ठिकाणी शिडी पोहचत नाही. तिथे लाईनमन स्वताच्या कौशल्यावर खांबावर चढतात.दुरुस्तीसाठी सावधगिरीची उपाय योजना म्हणून वीज खात्यातर्फे बेल्ट पुरविण्यात येतात हि खरी गोष्ट असली तरी बेल्ट बांधून दुरुस्ती करताना सहजपणे हालचाली करता येत नाहीत व दुरुस्तीचे काम होत नाहीत असा हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे.त्यामुळे असे बेल्ट  वापरण्याचा कुणी प्रयत्न करीत नसावेतप्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो वीज खाबांच्या इतक्या उंचीवरून आपण खाली पडलो तर काय होणार हे  माहित असल्याने मुद्दामहुन बेल्ट न बांधण्याची कुणी जोखीम स्विकारणार नाही.केवळ नाइलाजाने तशी जोखीम स्विकारावी लागते.अशावेळी तोल गेला किंवा हात पाय सुटला तर खांबावरुन पडलेला लाइनमन जमनीवर,दगडावर आपटु नये म्हणून ना जाळे किंवा ना कसली उपाय योजना. खांबावरुन वीज कर्मचारी पडुन अपघात झाला तर एक तर हात पाय मोडल्याने अपंगत्व,मृत्यू येणे अशा घटना घडतात. असे असुन किरकोळ मार लागून सदर कर्मचारी बचावला तर तो भाग्यवान म्हणावे लागेल.

वीज दुरुस्तीचे काम करताना आज पर्यंत पेडणे तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण राज्यभर असे अधूनमधून अपघात होत असातात.त्यासाठी बकेट असलेली क्रेन,खाली जाळ्याची सोय किंवा अत्याधुनिक उपाय योजना करणे गरजेचे आहे. क्रेन हि रानात  वगैरे सगळीचकडे नेता येणार नसली तरी किमान शक्य तिथे तरी नेता येवून काम करता येइल.सद्द्या उत्तर गोव्यात पणजी व म्हापसा वीज कार्यालयाशी तेवढ्या दोन बकेट क्रेन आहेत.असे  अपघात लक्षात घेऊन वीज खात्याने वीज कार्यालयाना क्रेन पुरविणे गरजेचे आहे व त्याच बरोबर आधुनिक तंत्रज्ञाना द्वारे काही उपाय योजना करता येणे शक्य आहे का यावर गंभीरपणे विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या