Goa: आगोंद, पाळोळे किनाऱ्यांची होतेय झीज; संरक्षक भिंत उभारण्याची गरज

agonda beach.jpg
agonda beach.jpg

काणकोण: काणकोणमधील (Kankon) किनारी (Coast) भागात संरक्षक भिंत (Protective wall) उभारण्याची गरज ‘तौक्ते’ (Tauktae) वादळाच्या प्रलयकारी स्वरूपामुळे अधोरेखित झाली आहे. मानवाने समुद्राकडे (sea) आगेकूच केली की समुद्र जमीन गिळंकृत करू लागतो, हा संशोधनाचा विषय आहे. किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने ते शोधून त्यावर उपाय योजना करण्याची गरज आहे. (Need to build a protective wall in the coastal area of Kankon)

किनाऱ्यावरील खासगी जमिनीत भरती रेषेपासून 50 मीटर अंतरावर पर्यटन व्यवसायासाठी हंगामी बांधकामे करण्यास प्राधिकरणाकडून परवानगी दिली जाते. गेल्या वादळात आगोंद(Agonda), पाळोळे(Palolem) येथील विध्वंस पाहता वादळामुळे समुद्राच्या प्रलयंकारी लाटा भरती रेषा ओलांडून 50 मीटर आतपर्यंत शिरून पर्यटन व्यावसायिकांचे होत्याचे नव्हते केले, असे म्हणण्यास जागा आहे. आगोंद येथील पर्यटन व्यावसायिकांचे कोट्यावधी रुपयांची नुकसानी झाली आहे. पाळोळे येथेही पर्यटन व्यावसायिकाची अपरमित नुकसानी झाली. 

वादळामुळे व प्रलयंकारी लाटांनी किनाऱ्यावर उभारलेल्या संरक्षक भिंती कोसळून गेल्या आहेत. त्यामुळे किनारी भागातील बागायत जमिनीची धूप होत आहे. या ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्याची गरज येथील जमीन मालक व पर्यटन व्यावसायिक सूरज नाईक गावकर, नंदीप भगत व पंकज नाईक गावकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काणकोणला भेट दिल्यानंतर त्यांना मागणीचे निवेदन देऊन केली आहे. त्यामुळे काणकोणमध्ये  काहीच्या भुवया उंचावल्या आहेत.

यापूर्वी तळपण किनाऱ्यावर सरकारने किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी लाखो रुपये खर्चून दगडी संरक्षक भिंत उभारली आहे. या किनाऱ्यालगतच मनुष्यवस्ती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com