गोवा काँग्रेस पक्षबांधणीसाठी सध्याचे प्रदेशाध्यक्ष असमर्थ

The need for a change of state president for party affiliation
The need for a change of state president for party affiliation

पणजी: काँग्रेस पक्षबांधणीसाठी तळागाळात तसेच प्रभाग स्तरावर काम करण्याची तसेच पक्ष मजबूत करण्याची गरज आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे २०२२ ची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसला प्रभावीपणे काम करायला हवे त्यासाठी नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावी, असे मत फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी व्यक्त केले. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली राज्यात मांद्रे, म्हापसा व शिरोडा या मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक झाली. मात्र, या तिन्ही मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीतही ते काँग्रेसचा प्रभाव पाडू शकले नाहीत. दक्षिण गोवा खासदार जागा फ्रांसिस सार्दिन यांनी स्वतःच्या बळावर जिंकली तर उत्तरेतील जागा गमावावी लागली. ते पक्षाची धुरा सांभाळू शकत नाहीत. प्रदेशाध्यक्ष चोडणकर हे ज्येष्ठ नेत्यांना वगळून तरुणांना उमेदवारी देण्याची भाषा करत आहेत व उमेदवार शोधत आहेत त्यावर मत आमदार रवी नाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले.


प्रदेशाध्यक्षानी केलेल्या वक्तव्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस न लढविण्याचा विचार झाला आहे का असे विचारले असता आमदार नाईक म्हणाले की, मी ते आता काही सांगू शकत नाही व काय निर्णय घ्यायचा हे ठरविलेले नाही. सध्या मी काँग्रेसचाआमदार आहे.

प्रदेशाध्यक्षाबरोबर विरोधी पक्षनेतेपद बदलायला हवे असे वाटते का यावर आमदार नाईक यांनी सांगितले की, त्याबाबत मी काही बोलू इच्छित नाही मात्र विरोधी पक्षनेत्यांनी अधिक सक्रिय व आक्रमक व्हायला हवे. सरकारकडून जेथे चुका होतात त्यावर अधिक कडक भूमिका घ्यायला हवी. दोन्ही मुलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तुम्ही समाधानी आहात का यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला आमदार नाईक यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com