करासवाडा जंक्शन धोकादायक; सर्विस रस्त्यावरुन वळवण्यात आली वाहतूक

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

जोडरस्ता असल्यामुळे करासवाडा जंक्शनवर वरचेवर अपघात घडून वाहतूक खोळंबून जात असल्यामुळे उड्डाण पुलाची करासवाडा जंक्शनवर अत्यंत आवश्यकता असल्यामुळे उड्डाण पुलाचे काम जोरात सुरु करण्यात आले होते.

कोलवाळ : करासवाडा जंक्शनवरील उड्डाण पुलाचे काम बरेच रेंगाळल्यामुळे वाहतुकीला व्यत्यय येऊन वाहतूक खोळंबून जाते. करासवाडा जंक्शनवर महामार्ग क्रं. १७ व महामार्ग क्र. ४ वा जोडरस्ता असल्यामुळे महाराष्ट व कर्नाटक राज्यातून या मार्गावरुन रात्रंदिवस हजारो वाहनांची वाहतूक चालू असते. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी करासवाडा जंक्शनवरील उड्डाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. महाराष्ट व कर्नाटकातून येणाऱ्या पर्यटकांना करासवाडा जंक्शनवरुन वाहने चालवावी लागतात. जोडरस्ता असल्यामुळे करासवाडा जंक्शनवर वरचेवर अपघात घडून वाहतूक खोळंबून जात असल्यामुळे उड्डाण पुलाची करासवाडा जंक्शनवर अत्यंत आवश्यकता असल्यामुळे उड्डाण पुलाचे काम जोरात सुरु करण्यात आले होते.

करासवाडा जंक्शनवर येणाऱ्या जलवाहिन्या व वीजवाहिन्यांचे स्थलांतर करण्यासाठी बराच वेळ गेल्यामुळे उड्डाण पुलाचे काम बरेच रेंगाळले आहे. महामार्ग प्राधिकरणाने सदर पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी कोणतीच पावले उचलली नसल्यामुळे करासवाडा जंक्शनवरील उड्डाण पुलाचे काम संथगतीने चालू असल्याचे दिसून येत आहे. करासवाडा जंक्शनवरील हा पूल पूर्ण झाल्यानंतर उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला सर्विस रस्ता व गटारांचे काम करण्यासाठी सुरुवात केली नसल्यामुळे करासवाडा जक्शनवरील वाहतूक वळवताना बरेच त्रास होत आहेत.

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाचे सहापदरी रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाला आदेश दिले आहेत. महामार्गावरील उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करण्यात येत असल्यामुळे ठिकठिकाणी महामार्गाचे काम अर्धेअधिक पूर्ण करुन महामार्गावरुन वाहतुकीला सुरुवात करण्यात आली आहे.

कोलवाळ ते करासवाडापर्यंत येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम संथगतीने चालू असल्यामुळे वाहन चालकांचे बरेच हाल होत आहेत. बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी सर्विस रस्त्यावरुन वाहतूक वळवण्यात आली आहे. सर्विस रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांचे बरेच हाल होत आहेत. वाहतुकीच वरचेवर कोंडी होऊन वाहतूक खोळंबून जात असते. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा काहीच अंदाज येत नसल्यामुळे वाहने खड्ड्यात अडकून पडतात व अपघात घडतात. या जंक्शनवरील उड्डाण पुलाचे काम रात्रंदिवस चालू ठेवून पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याची लोक प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या