राज्यातील पर्यटनाला योग्य दिशा देण्याची गरज

dainik gomantak
शनिवार, 23 मे 2020

‘बी लाईव्ह’चे समर्थ खोलकर यांनी समन्वयक म्हणून चर्चासत्र हाताळले. पहिल्या सत्रात समर्थ खोलकर, फ्रान्सिस्को डी ब्रागांझा, रवी शंकर यांनी मते मांडल्यानंतर दुसऱ्या सत्रात पराग रांगणेकर, जॅक सुखिजा व विन्सन्ट रामोस यांनी विचार मांडले.

पणजी, 

‘कोरोना’चा धोका टळल्यानंतर राज्यातील पर्यटनाला योग्य दिशा देणे गरजेचे आहे. योग्य प्रकारच्या पर्यटन व्यवसायाला चालना देताना स्थानिक समुदायांसाठी केवळ नोकरी, व्यवसाय नव्हे, तर उदरनिर्वाहाची साधने बनविणारे प्रागतिक बदल पर्यटन व्यवसायात करणे आवश्यक आहेत, असे मत ‘आयडियाज फॉर गोवा’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन वेब सेमिनार’च्या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.
‘आयडियाज फॉर गोवा'तर्फे आयोजित केलेल्या वेबिनारमध्येल'पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य’ या व्यवसायांची सध्याची स्थिती व वाटचाल या विषयीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ‘पंजीम इन’चे जॅक सुखिजा, ताज हॉटेल उद्योग समूहाचे विन्सन्ट रामोस, ‘मृगया नेचर रिट्रीट’चे पराग रांगणेकर, ‘दृष्टी मरीन’चे सीईओ रवी शंकर, ‘डबल ट्री’चे मालक फ्रान्सिस्को डी ब्रागांझा आणि ‘सितारा ट्रॅव्हल्स’चे अर्नेस्ट डायस यांनी सहभागी होत आपले योगदान देताना विचार व संकल्पना मांडल्या.
रांगणेकर म्हणाले, चांगले आदर्श पर्यटक जिथे भेट देतात, त्या स्थळाचा आदर करतात आणि चांगल्या अतिथीचे उदाहरण ठेवतात. पर्यटकांचा दर्जा ठरविल्यानंतर किंवा आपल्याला कसे पर्यटक पाहिजेत याची‘बी लाईव्ह’चे समर्थ खोलकर यांनी समन्वयक म्हणून चर्चासत्र हाताळले. पहिल्या सत्रात समर्थ खोलकर, फ्रान्सिस्को डी ब्रागांझा, रवी शंकर यांनी मते मांडल्यानंतर दुसऱ्या सत्रात पराग रांगणेकर, जॅक सुखिजा व विन्सन्ट रामोस यांनी विचार मांडले. व्याख्या स्पष्टपणे निश्चित केल्यानंतर उगाच गडबड गोंधळ व धिगाणा घालणारे पर्यटक चार हात दूरच राहिले, असे एवढी वर्षे वन्यजीव पर्यटन व्यवसायात काढल्यावर आपण सांगू शकतो. ‘कोरोना’ संपल्यानंतर योग्य पद्धतीचे पर्यटन पुढे केले पाहिजे. स्थानिक उद्योग समुदायांना केवळ नोकऱ्याच नव्हे, तर जीवन जगण्याचे व उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पर्यटनाचा विकास झाला पाहिजे.
‘पणजी इन’चे जॅक सुखिजा म्हणाले, फौंतेन्हासचा विकास करून पणजी शहराचे आकर्षण बनविले पाहिजे. त्यामुळे केरळमधील फोर्ट कोचिनप्रमाणे फौंतेन्हास एक वारसास्थळाप्रमाणे भेट देण्याचे आवडते पर्यटनाचे ठिकाण बनू शकते. विषाणूमुळे निर्माण झालेल्या महामारीचे भीषण परिणाम येणाऱ्या काळात ओसरले जाण्याची शक्यता कमी असून टाळेबंदीचा काळ संपला तरीही हे उद्योग व्यवसाय यामधून लवकर सावरण्याची शक्यता अजूनतरी धूसर आहे. त्यामुळे गोव्याची एक नवीन प्रतिमा वा ओळख कशी निर्माण करता येईल? हा खरोखरच आव्हानात्मक प्रश्न असल्याचे मत चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.

विविध समित्या व ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा यांनी त्यादृष्टीने यापूर्वी बरेच काम केलेले आहे. पण, चांगले मजबूत सार्वजनिक संबंध व चांगली प्रतिमा निर्माण करण्याविषयी सांघिक प्रयत्न अजून झालेले नाहीत. केरळने आपल्या राज्याची ओळख ‘गॉडस ओन कंट्री’ अशाप्रकारे मोहिमा राबवून केली. त्याप्रमाणे चांगल्या प्रसिद्धी मोहिमा राबवून राज्याची प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.
- विन्सन्ट रामोस

संबंधित बातम्या