राज्यात प्रादेशिक पक्षाच्या सरकारची गरज

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

राज्यात ज्या पद्धतीने सरकार लोकविरोधात प्रकल्प लादत आहे व त्याला विरोध करण्यासाठी अहोरात्र त्याविरुद्ध लढा देण्याची पाळी लोकांवर आणली आहे ते पाहता गोवा हे विद्ध्वसंकाच्या दिशेने जात आहे. गोव्याच्या बचावासाठी प्रादेशिक पक्षाचे सरकार सत्तेवर येण्याची गरज आहे.

पणजी:  राज्यात ज्या पद्धतीने सरकार लोकविरोधात प्रकल्प लादत आहे व त्याला विरोध करण्यासाठी अहोरात्र त्याविरुद्ध लढा देण्याची पाळी लोकांवर आणली आहे ते पाहता गोवा हे विद्ध्वसंकाच्या दिशेने जात आहे. गोव्याच्या बचावासाठी प्रादेशिक पक्षाचे सरकार सत्तेवर येण्याची गरज आहे. सरकारकडून सतावणूक केली जात असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात प्रादेशिक पक्षाचेच सरकार सत्तेवर आणण्याचा गोमंतकीयांनी निर्धार केला आहे, असे मत किरण कांदोळकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाचे कार्याध्यक्ष पदाचा ताबा घेतल्यानंतर व्यक्त केले. 

पणजीत गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यालयात आमदार विनोद पालयेकर यांनी कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांचे स्वागत केले. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत उपस्थित होते. पक्षाने जी जबाबदारी सोपविली आहे ती स्वीकारून पक्षाला सत्तेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यात आतापर्यंत काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षानी सरकारे चालविली मात्र त्यानी गोव्याचे हित जपण्याऐवजी त्याला विध्वसंकाकडे नेण्याचे काम केले आहे असा आरोप त्यांनी केला. राज्यात प्रकल्प आणून लादत असल्याने जनता भाजप सरकार कंटाळली असल्याचेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या