Nelson Mandela Nobel Peace Award: सिद्धेश नाईक यांना नेल्सन मंडेला शांतता पुरस्कार व मानद डॉक्टरेट प्रदान

सिद्धेश नाईक (Siddesh Shripad Naik) यांच्यासह देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना डॉक्टरेट (Doctorate) प्रदान (Nelson Mandela Nobel Peace Award)
Nelson Mandela Nobel Peace Award: सिद्धेश नाईक यांना नेल्सन मंडेला शांतता पुरस्कार व मानद डॉक्टरेट प्रदान
Siddesh Shripad Naik awarded Nelson Mandela Nobel Peace Award and Doctorate degree, at Pune. on Wednesday, 21 July, 2021Dainik Gomantak

पुणे (Pune) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यक्रमात नेल्सन मंडेला नोबेल पिस अवॉर्ड (Nelson Mandela Nobel Peace Award) अकादमीचे चेअरमन डॉ. राजकुमार टाक व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू श्री प्रल्हाद दामोदरदास मोदी (Brother of Narendra Modi) यांच्या हस्ते श्री सिद्धेश श्रीपाद नाईक (son of Central Minister Shripad Naik) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी American University of Global Peace या विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवीही सिद्धेश नाईक यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू श्री. प्रल्हाद दामोदरदास मोदी, अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पिस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मधुकृष्णन व बॉस्नियाचे राजदूत सुहास मंत्री, नेल्सन मंडेला नोबेल पिस अवॉर्ड अकादमीचे चेअरमन डॉ.राजकुमार टाक, उपाध्यक्ष डॉ. विजय सिंह पाटील, सेक्रेटरी जोशुआ इमान्यल व मान्यवर उपस्थित होते.

Siddesh Shripad Naik  awarded Nelson Mandela Nobel Peace Award and Doctorate degree, at Pune. on Wednesday, 21 July, 2021
Pernem: सम्राट क्लब पेडणे टाऊन तर्फे २३ रोजी गुरुपौर्णिमा

याच कार्यक्रमात हॉकीपटू (Hockey Player) धनराज पिल्ले, सुप्रसिद्ध गायक (Singer) कुमार सानू, गायिका पलक मुच्चल, श्री सुहास मंत्री, श्री नितिन न्याती, सौ सुलक्षणा धार, सेऊल शाह, श्री मच्छिंद्र मुंडे यांनाही डॉक्टरेट पदवीने (Doctorate degree) सन्मानित करण्यात आले.

Siddesh Shripad Naik  awarded Nelson Mandela Nobel Peace Award and Doctorate degree, at Pune. on Wednesday, 21 July, 2021
Goa: सालेली गडावर स्थानिक युवकां तर्फे वृक्षारोपण

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com